Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Weather Alert : रत्नागिरी-कोल्हापूरला ‘रेड अलर्ट’, महाराष्ट्रात मान्सूनची दमदार हजेरी; पाहा कुठे कोणता अलर्ट

Maharashtra Rain Alert Today : महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार सुरुवात केली असून रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा घाटासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, पुणे घाट आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा. नागरिकांना हवामान खात्याचा सतर्कतेचा सल्ला.

Namdeo Kumbhar

Weather Today In Maharashtra Mumbai Pune : महाराष्ट्रात मान्सूनने दमदार एंट्री घेतली असून कोकण, पुणे घाटमाथा आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी आज रेड अलर्ट जारी केला आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी ऑरेंज अलर्ट आणि उर्वरित राज्यासाठी येलो अलर्ट दिला आहे.

सोमवारी (ता. २६) सकाळपर्यंत रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळला. रायगडमधील मुरूड येथे सर्वाधिक ३७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर श्रीवर्धन, म्हसळा आणि रत्नागिरीतील हर्णे येथे ३०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला. मुंबईसह कोकणात दिवसभर पावसाचा जोर कायम होता. मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.

रेड अलर्ट : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा घाटमाथा. ऑरेंज अलर्ट : रायगड, पुणे घाटमाथा, सातारा, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड. येलो अलर्ट : ठाणे, मुंबई, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, गडचिरोली, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मराठवाडा आणि परिसरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. तेलंगणा, छत्तीसगड ते आंध्रप्रदेशपर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे, तर बंगालच्या उपसागरात आज (ता. २७) कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, रायगड, पुणे, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड येथे जोरदार पाऊस अपेक्षित आहे. ठाणे, मुंबई, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि गडचिरोलीतही वादळी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि पूर, भूस्खलन यांसारख्या संभाव्य धोक्यांपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनानेही आवश्यक खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shefali Jariwala Property: शेफाली जरीवालाची एकूण संपत्ती किती? वारसदार कोण?

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

Sushil Kedia: मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान|VIDEO

SCROLL FOR NEXT