Maharashtra Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain: राज्यात ऊन-पावसाचा खेळ! परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार, ७ जिल्ह्यांना इशारा

Maharashtra Weather Update: राज्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे. आज ७ जिल्ह्यांना हवामान खात्याने इशारा दिला आहे. या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Priya More
  • महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा अंदाज

  • महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

  • कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

  • पुण्यात ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच कडाक्याचे ऊन

  • महाराष्ट्र हवामान विभागाचा आजचा पावसाचा अलर्ट

राज्यात सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या मान्सूनच्या परतीसाठी पोषक हवामान तयार झाले आहे. परतीचा पाऊस काही जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घालत आहे. तर काही जिल्ह्यांत कडाक्याचे ऊन पाहायल मिळत आहे. आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी उन्हाचा पारा चढण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याच अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित राज्यात ढगाळ हवामान आणि ऊन सावल्यांच्या खेळ सुरू राहिल. त्याचसोबत या भागांमध्ये उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज आहे.

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याचे चटके जाणवण्यास सुरूवात झाली आहे. तापमान सरासरीपेक्षा एक-दोन अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज आहे. पावसाळा संपताच पुणेकरांना ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच कडक उन्हाचे चटके बसू लागले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहराच्या कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. पारा ३३ ते ३४ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचला आहे.

कडक ऊन आणि हवेतील आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. यंदा ऑक्टोबर महिन्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा एक ते दोन अंशांनी अधिक राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetics : डायबिटिसचे रुग्ण आंबा खाऊ शकतात का?

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्क येथे कॉक्रोज जनता पार्टीचे आज आंदोलन

Accident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! देवीची मूर्ती नेताना पिकअपला ट्रकची धडक; ७ जणांचा जागीच मृत्यू

Pitru Paksha: पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करावे की नाही?

आमदार मेहतांची मुजोरी संपेना, 'मिरा-भाईंदर ही जैनांची नगरी'

SCROLL FOR NEXT