Maharashtra Rain Alert Saam Tv
महाराष्ट्र

Rain Alert: राज्यासाठी पुढचे ३ दिवस महत्वाचे, अतिमुसळधार पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट

Maharashtra Weather Update: राज्यासाठी पुढचे ३ दिवस महत्वाचे असणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Priya More
  • महाराष्ट्रात पुढील ३ दिवस पावसाचे

  • महाराष्ट्रातील जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

  • पुणे, रायगडमध्ये अतिमुसळधार पाऊस

  • विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाहाकार सुरू आहे. तर काही ठिकाणी अधुनमधून पाऊस पडत आहे. अशामध्ये आता हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी पुढचे ३ दिवस महत्वाचे असणार असल्याचे सांगितले आहे. या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

पुण्यातील हवामान शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात येणारे ३ दिवस पावसाचे असणार आहे. विदर्भासाठी आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भासह राज्यातील अनेक भागात पुढील तीन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे.

पुण्यात जुलै महिन्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शनिवारनंतर पाऊस उघडीप घेणार आहे. राज्यात पुढील तीन दिवस काही भागात रेड तर काही भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अजुनही पावसाची प्रतीक्षा आहे. या भागातील शेतकरी चिंतेत आहेत.

दरम्यान, आज हवामान खात्याने पुणे आणि रायगडमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. आज पुणे घाटमाथा, जळगाव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर घाटमाथा, परभणी, हिंगोली आणि जालना येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, बीड, अहिल्यानगर, धाराशिव, संभाजीनगर, लातूर, बुलडाणा, अमरावती, अकोला, भंडारा, वर्धा, नागपूर, अहिल्यानगर, वाशिम आणि यवतमाळमध्ये या जिल्हयांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Health : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा बिघडली

Maharashtra News Live Update: : बीडच्या माजलगाव येथील लाहमेवाडी येथे टायर जाळत रस्ता रोको आंदोलन प्रशासनाचा निषेध

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

SCROLL FOR NEXT