Maharashtra Heavy Rain Alert Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Rain Alert: पुढील 4 दिवस महत्त्वाचे! राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, पुण्यात आज जोरदार सरी बरसणार

Maharashtra Weather Updates: आज पुणे आणि परिसरात काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.

Chandrakant Jagtap

IMD Latest Updates: राज्यातील पावसाच्या दृष्टीकोणातून पुढील ४ दिवस अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. कारण येत्या चार दिवसांत राज्यातील काही भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) बरसण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरावर CYCIR ची निर्मिती झाली आहे. तसेच NW दिशेने आत जाण्याची दाट शक्यता असल्याचे हवामान खत्याने म्हटले आहे.

यानंतर लगेचच आणखी एक CYCIR 19 जुलैपर्यंत बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या दोन्ही प्रणालींमुळे महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान आज पुणे आणि परिसरात काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. (Tajya Marathi Batmya)

काही शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतिक्षेत

राज्यात पूर्णपणे मान्सून सक्रिय झाला असला तरी अद्यापही काही जिल्ह्यांना पावसाची प्रतिक्षा आहे. अनेक ठिकाणी पावसाअभावी खरीप हंगामातील पेरण्या रडखडल्या असून बळीराजा संकटात सापडला आहे. काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट देखील ओढवलं आहे. मात्र येत्या चार दिवसात या भागात पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. (Latest Political News)

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे १९ ते २२ जुलै या काळात राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shilpa Shinde: 'अंगूरी भाभी' जेलमध्ये जाणार? प्रोड्यूसरवर हरेसमेंटचे खोटे आरोप भोवले, अभिनेत्रीच्या अटकेची मागणी

Pune Hospital: पुण्यातील आरोग्य विभाग 'व्हेंटिलेटर'वर, पालिका रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचा तुटवडा; धक्कादायक आकडेवारी समोर

एक नंबरचे स्वार्थी आणि ढोंगी असतात 'ही' माणसं! आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 'या' २ सवयींवरून ओळखा

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाचे दमदार आगमन

Mumbai Crime : मुंबईत भयंकर घडलं! आईच्या बॉयफ्रेंडचं टाळकं सटकलं, अमानुष मारहाणीत ४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT