Aditya Thackeray
Aditya Thackeray SAAM TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात नक्की काय शिजतंय? फडणवीसांविषयी अदित्य ठाकरेंचं मोठं विधान

Chandrakant Jagtap

Maharashtra Politics: ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांबाबात मोठं विधान केलं आहे. आमच्यात राजकीय विरोध असू शकतो पण आम्ही अजूनही त्यांना मित्र मानतो, तुम्ही त्यांना विचारा ते आम्हाला काय समजतात? असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना शत्रु मानता की मित्र असा प्रश्न विचारल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 'लोकमत'च्या युथ आयकॉन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी अनेक विषयांवर आपले मत स्पष्टपणे मांडले.

बंडखोरीविषयी काय म्हणाले अदित्य ठाकरे?

शिंदे आणि काही आमदार आमचं सरकार असतानाच बंडखोरी करणार याची आम्हाला सुद्धा कल्पना होती, असा खुलासा देखील यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांची सर्जरी झाली त्याच काळात यांचं प्लॅनिंग सुरू होतं. मला आठवतं 20 मे रोजी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना या चर्चांसंदर्भात विचारलं देखील होतं. पण जे जाणार असतात त्यांना थांबवू शकत नाही आणि उपयोग पण नाही असे आदित्य ठाकरे म्हणाले. (Maharashtra Political News)

जे आमच्यासोबत तेच आमचं कुटूंब

यावेळी आदित्य ठाकरेंना कुटुंब म्हणून राज ठाकरे यांनी एकत्र यायला हवं का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, मी पॉलिसीजवर विश्वास ठेवतो. या सगळ्या वैयक्तिक गोष्टी आहेत. जे सध्या आमच्यासोबत आहेत ते आमचं कुटुंब आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. (Latest Marathi News)

यावेळी सर्वे संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले शिंदे गट आणि भाजप सर्व्हेवर विश्वास ठेवणारे आहेत. हे सर्व्हेवर चालतात आणि सर्व्हे हे सांगतोय की त्यांनी जी गद्दारी केली, त्यामळे त्यांना थोडीशी भीती आहे. तुम्ही निवडणुकीला घाबरता, मग लोकशाही काय कामाची? 40 गद्दारांबद्दल एकही सांगत नाही की त्यांनी खोक्याला हात लावलेला नाही. गद्दारांकडे काडी मात्र लक्ष देत नाही, निवडणुकीत त्यांना त्यांच स्थान कळेल असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले.

सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर काय म्हणाले?

आदित्य ठाकरे म्हणाले, सुप्रीम कोर्टात हा गांभीर्याने विषय झाला, निवडणूक आयोग काँप्रोमाइज झालं. आता ही लढाई फक्त शिवसेनेची राहिली नाही. यावरील निकाल हा संपूर्ण न्यायव्यवस्था, संविधान आणि लोकशाही कशी सुरक्षित ठेवता येईल हे ठरवेल. आमची लढाई ही आत्ता लोकशाही आणि संविधानासाठी आहे असे ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : दामोदर पार्कपासून नरेंद्र मोदींच्या रोड शोची होणार सुरुवात

Maharashtra Weather Update: पुढच्या ४८ तासांत या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पडणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

PM Narendra Modi : प्रफुल पटेलांनी PM नरेंद्र मोदींना घातला जिरेटोप; नव्या वादाला फुटलं तोडं

Special Story: गॅस भरायला पंपावर गेले आणि एका क्षणात सगळं संपलं! घाटकोपर दुर्घटनेनं नालासोपाऱ्याचं कुटुंब पोरकं केलं

पुण्याचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा, नेमकं काय आहे प्रकरण?|Ravindra Dhangekar

SCROLL FOR NEXT