Sudhir Mungantiwar chief minister remark sparks debate in Maharashtra 
महाराष्ट्र

Maharashtra Politics: वडेट्टीवार अन् भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांना व्हायचंय मुख्यमंत्री; मनातलं आलं ओठांवर

Wadettiwar-Mungantiwar : भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात या वक्तव्याची चर्चा रंगलीय.

Bharat Jadhav

  • सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांची चंद्रपुरातील एका कार्यक्रमात भेट

  • कार्यक्रमादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये दिलखुलास गप्पा

  • दोन्ही नेत्यांच्या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसण्याचं स्वप्न कोणत्या नेत्याला नाही पडत? महायुतीचे नेते असो नाहीतर मविआमधील नेते. सर्वांना मुख्यमंत्री होऊ वाटतं. दोन्ही आघाडीमधील नेत्यांनी अनेकवेळा आपल्या इच्छा बोलूनही दाखवल्या आहेत. इतकेच नाहीतर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी देवीच्या चरणी कोकणी भाषेत गाऱ्हाणं घालण्यात आलं. आता भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांना मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पडू लागलंय.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासमोर सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवलीय. चंद्रपुरात एका कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांची भेट झाली. कार्यक्रमादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या दिलखुलास गप्पांचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

आपण दोघेही वार आहोत.एक वार मुख्यमंत्री झाला पाहिजे" हा संवाद सध्या चर्चेचा विषय ठरतोय. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.दोन्ही नेत्यांच्या मनात चाललंय याबाबत तर्क काढले जात आहेत. दोन्ही नेत्यांपैकी कोणता नेता पक्षात्तर करणार अशी चर्चा सुरू झालीय.

दरम्यान राज्याचं सर्वोच्च पद आपल्याला मिळावं ही प्रत्येक नेत्यांची इच्छा असते. मग ते सत्तेतील लोक असो की विरोधी पक्षातील. प्रत्येकाला मुख्यमंत्री होण्याची इच्छा असते. अनेकजण आपल्या नेत्याचे बॅनर्स लावताना त्यांना भावी मुख्यमंत्री असं संबोधतात. सध्या काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही आपल्या मनातील इच्छा जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवलीय.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत हस्तांदोलन करतानाचा मुक्त संवाद मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. चंद्रपूर शहरातील रयतवारी कॉलनी भागात काल तेलगू भाषिकांचा बदकम्मा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला हजेरी लावून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार बाहेर पडत असतानाच तितक्यात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आत आले.

त्यावेळी दोघांची काही क्षणासाठी भेट झाली. यावेळी विजय वडेट्टीवारांनी हस्तांदोलन करत सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत आपली “मन की बात” शेअर केली. आपण दोघेही वार आहोत… आपल्यापैकी एक वार मुख्यमंत्री झाला पाहिजे, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं. विशेष म्हणजे वडेट्टीवार यांच्या या शुभेच्छांना मुनगंटीवार यांनी देखील अतिशय दिलखुलासपणे हसत दाद दिली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT