Maharashtra Vidhan Sabha Election Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मविआची १२५ जागांवर सहमती, काँग्रेस नेत्याची माहिती; विधानसभेला किती जागा जिंकणार सांगून टाकले

Priya More

सचिन बनसोडे, अहमदनगर

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) चांगलीच कंबर कसली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकांवर बैठका सुरू आहे. या निवडणुकीमध्ये आपली सत्ता यावी यासाठी मविआकडून प्रयत्न सुरू आहेत. अशातच काँग्रेसच्या बड्या नेत्याने मोठे वक्तव्य केले आहे. 'महाविकास आघाडीची १२५ जागांवर सहमती झाली आहे. मविआ विधानसभेला १८० पेक्षा जास्त जागा जिंकणार.' असा दावा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, 'मविआच्या दोन-तीन बैठका झाल्या. जवळपास १२५ जागांवर सहमती झाली आहे. उर्वरित जागांवर चर्चा सुरू आहेत. आम्हाला महायुतीचे आव्हान वाटत नाही. जनतेने या सरकारला नाकारलंय. लोकसभा निवडणुकीत ते दिसून आले. महाविकास आघाडी विधानसभेला १८० पेक्षा जास्त जागा जिंकणार आहे.' तसंच, महायुती मैत्रीपूर्ण लढतीच्या चर्चावर त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'महायुती आणि आमची तुलना करू नका. महायुतीत जागा वाटपावरून मारामारी सुरू आहे.', असा टोला त्यांनी लगावला.

अजित पवारांना कार्यकर्त्याने लहिलेल्या पत्रावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, 'अजित पवारांची भूमिका महाराष्ट्र आणि बारामतीच्या जनतेला देखील आवडली नाही. त्यामुळेच कार्यकर्त्याने प्रातिनिधिक पत्र पाठवले असेल.' एमआयएम मविआमध्ये सहभागी होण्याबाबत चर्चा सुरू आहेत. यावर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, 'प्रस्ताव दिल्याचे मला माहित नाही. मात्र प्रस्ताव आल्यास उच्च पातळीवर चर्चा होईल.', असे देखील त्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

SCROLL FOR NEXT