Anand Dubey resigns from Thackeray faction during INDIA Alliance rally saam tv
महाराष्ट्र

इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान ठाकरे गटाला मोठा धक्का; पक्ष प्रवक्त्याचा तडकाफडकी राजीनामा

Thackeray Group Leader Resignation : इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी राजीनामा दिलाय. पक्षाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी असल्याच्या चर्चेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आलाय.

Bharat Jadhav

  • ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी राजीनामा दिला.

  • इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान मोठी राजकीय घडामोड

  • आनंद दुबे यांची ठाकरे गटाचा हिंदी चेहरा म्हणून ओळख

इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. ठाकरे गटाच्या प्रवक्त्यानं तडकाफडकी राजीनामा दिलाय. ठाकरे गटाचा हिंदी चेहरा असलेले आनंद दुबे यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय. पक्षाच्या कार्यभारावर आनंद दुबे नाराज होते, त्याचमुळे त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय. दुबे यांच्या राजीनाम्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीसाठी हा मोठा झटका बसल्याचं म्हटलं जातंय. महाविकास आघाडीमध्ये एकजुटीची चर्चा सुरू असतानाच दुबे यांचा राजीनाम्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजलीय.

राजीनामा देण्यामागील कारण काय?

आपल्या राजीनामा दिल्यानंतर आनंद दुबे म्हणाले की, राष्ट्रीय मुद्द्यांवर मतभेद असू शकतात परंतु राष्ट्रहित हेच सर्वोपरी असले पाहिजे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देताना त्यांनी सांगितले की, २६ एप्रिल रोजी त्यांनी पक्षाचे सहकारी आणि विधिमंडळ शाखेचे उप-संघटक गुलाबचंद मौर्य यांच्यासमवेत घटनास्थळाला भेट दिली होती. त्यावेळी त्या भागात गोळीबारामुळे तणावपूर्ण परिस्थिती असल्याचं त्यांनी नमूद केले. या भेटीदरम्यान त्यांनी फारुख अब्दुल्ला आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेऊन त्यांना आपल्या पक्षाचा पाठिंबा असल्याचे आश्वासन दिलं होतं.

देश आधी मग...

अशा संकटकाळात ज्येष्ठ खासदार आणि आमदारांनी घटनास्थळी भेट द्यायला हवी होती. जरी ते एखादे मोठे नेते किंवा नगरसेवक नसले, तरीही ते बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित आहेत. त्यांच्यात शिवसैनिकांची भावना आहे. देशासमोरील संकट हीच मुख्य बाब आहे. पक्ष आणि स्वतःचा विचार नंतर, पण देश आधी, असं आनंद दुबे यांनी ठामपणे सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट

Pravin Tarde: बॉलिवूडवाले अंत्यविधीला न आल्याने नाना पाटेकरांचं मोठेपण कमी होत नाही...; प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

Bedroom Decoration Ideas For Couple : रोमॅन्टिक कपलसाठी बेडरूम डेकोरशनच्या 5 भन्नाट आयडिया, आनंददायी वाटेल

Navratri 2026 : नवरात्रीत देवीसमोर 'या' दिशेला लावा अखंड दिवा; घरात येईल पैसाच पैसा

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीचा थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

SCROLL FOR NEXT