PM Modi, Uddhav Thackeray saam tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray News: आचार संहितेतला बदल फक्त मोदी, शहांसाठी केला का? उद्धव ठाकरेंचा सवाल; निवडणुक आयोगाला लिहले पत्र

Maharashtra Politics: ठाकरे गटाने निवडणुक आयोगाला पत्रही पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Gangappa Pujari

गिरीश कांबळे, प्रतिनिधी

Uddhav Thackeray News:

देशात होत असलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली असून सभा आणि रॅलींचा धडाका सुरू आहे. भाजपकडून राममंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन जोरदार प्रचार सुरू आहे. अशातच भाजपच्या निवडणुक प्रचारावर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केले असून याप्रकरणी ठाकरे गटाने निवडणुक आयोगाला पत्रही पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

"95 साली सरकार आले तेव्हा आमचे 5 ते सहा आमदार हे बाद ठरवले गेले. परंतु सगळ्यात धोकादायक असं की सहा आमदारांसोबत बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढण्यात आला होता. आणि हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून ही कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने आचार संहितेमध्ये बदल केलेत का?" असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच बदल करण्यात आला असेल तर आयोगाने आम्हाला पण सांगावं असेही ते म्हणाले.

"कर्नाटकमध्ये हनुमानाचा आशीर्वाद म्हणत प्रचार केला, मध्य प्रदेशमध्ये निवडणूक प्रचारात मोदींनी आम्हाला निवडून दिले तर अयोध्येला मोफत घेऊन जाणार असं सांगितलं. मात्र लोकांना जेव्हा जायचं असेल तेव्हा भाजपने त्यांना मोफत घेऊन जा," अशी आमची मागणी असल्याचेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राममंदिराच्या उद्घाटनाला जाणार का?

दरम्यान, राम मंदिराच्या उद्घाटनाला जाणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंना विचारला. यावर बोलताना त्यांनी "उदघाटनाला जाण्याचा लांबचा विषय आहे. त्यांच्या सोयीनुसार, निवडणुक डोळ्यांसमोर ठेवून हे उद्घाटन करत आहेत. भाजप अनेक लोकांना बोलावणार आहे, त्यांचा मोठा पक्ष आहे, ते मोठी गर्दी जमवू शकतात, त्यांच्या गर्दीत मी कुठे जाऊ?" असा टोला ठाकरेंनी लगावला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील धामणगावच्या राठी जीन परिसरात भीषण आग

केजरीवालांच्या आपमध्ये फूट, राघव चड्डांसह 3 खासदारांचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार

Mithila Palkar: परी म्हणू की सुंदरा...; मिथिला पालकरचा हटके स्वॅग

Panvel Tourism: अवघ्या १०० रूपयांत फिरा पनवेलमधील ही ठिकाणे, विकेंडला येईल फुल टू मज्जा

Pune News: अंगावर घसरगुंडी कोसळून चिमुकलीचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोर सोडले प्राण; पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT