Uddhav Thackeray And Eknath Shinde Saam TV Nws Marathi
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महाराष्ट्रात नवं राजकीय समिकरण, याठिकाणी दोन्ही शिवसेना एकत्र येणार? 'त्या' भेटीमुळे चर्चांना उधाण

Uddhav Thackeray And Eknath Shinde: कोकणात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राजकीय समिकरण बदलल्याची चिन्ह दिसत आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र येण्याची शक्यता आहे.

Priya More

Summary -

  • कोकणात ठाकरेंची आणि शिंदेंची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता

  • कणकवलीत दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरण बदलणार

  • कोकणात नवीन आघाडीची शक्यता निर्माण झालीये

विनायक वंजारी, सिंधुदुर्ग

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अशातच कोकणात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना कोकणामध्ये एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची कणकवलीत एकत्रित बैठक पार पडली. त्यानंतर ही चर्चा होऊ लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपने स्वबळाचा नारा दिला. त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने आपली ताकद वाढवायला सुरू केली आहे. कणकवली नगरपंचायतीमध्ये भाजपचे इच्छुक उमेदवार समीर नलावडे यांच्याविरुद्ध महाविकास आघाडी आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष एकत्र येताना दिसत आहेत.

कणकवली शहर विकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना या दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक झाली असल्याची माहिती पुढे येत आहे. यामध्ये नगराध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे सेनेचे नेते संदेश पारकर यांचे नाव पुढे येत असून त्याला शिंदे शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे देखील समजत आहे. तसं झाल्यास राज्याच्या राजकारणात नवीन समीकरण उदयास येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Waterfalls : महाराष्ट्रातील 'हे' ५ धबधबे खूप कमी लोकांना माहितेय, एकदा पाहिल्यावर प्रेमातच पडाल

IMD Alert : रखडलेला मॉन्सून 'या' दिवशी पुन्हा ॲक्टिव्ह; 'या' जिल्ह्यांना आज वादळी पावसाचा, तर मुंबई-ठाण्याला उष्णतेचा इशारा

Blood Pressure Control : ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी किती वेळ चालणं योग्य? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Health Care: रोज भात खाल्ल्याने वजन वाढते का? डॉक्टरांनी सांगितलं खरं कारण

Shraddha Kapoor - Eetha Video : श्रद्धा कपूरच्या 'ईथा'चा अंगावर काटा आणणारा टीझर, कोण होत्या विठाबाई नारायणगावकर?

SCROLL FOR NEXT