Deputy CM Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे डिप्रेशनमध्ये, त्यांचाही घात होणार; ठाकरे गटाच्या नेत्याची बोचरी टीका

Deputy CM Eknath Shinde: 'एकनाथ शिंदे मोठे गद्दार आहेत. गद्दारासोबत भाजप तसाच व्यवहार करणार. कारण गद्दारासोबत गद्दार सारखाच वापर भाजपा करेल.' , अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्याने केली.

Priya More

अमर घटारे, अमरावती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे उपनेते आणि आमदार नितीन देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. 'एकनाथ शिंदे यांचे खूप हाल होतील. जो दुसऱ्याला फसवतो त्याला कोणी एक दिवस फसवतो. तर जो दुसऱ्याचा घात करतो त्याचाही एक दिवस घात होत असतो एक दिवस त्याचा अंत होणार.' असा घणाघात आमदार नितीन देशमुख यांनी केला.

'एकनाथ शिंदे स्वतः डिप्रेशनमध्ये आहे. एकनाथ शिंदे मोठे गद्दार आहेत. गद्दारासोबत भाजप तसाच व्यवहार करणार. कारण गद्दारासोबत गद्दार सारखाच वापर भाजपा करेल.' अशी बोचरी टीका आमदार देशमुख नितीन देशमुख यांनी एकनाथ शिंदेंवर केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी बोलावलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले नव्हते. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. याआधीही राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी दोन मंत्रिमंडळ बैठकांना हजेरी लावली नव्हती आणि एका मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी त्यांनी त्यांच्या मंत्र्यांची स्वतंत्र बैठक घेतली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या महानगर विकास अधिकाऱ्यांची चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात बैठक बोलावली होती. शिंदे हे नगरविकास विभागाचे प्रमुख असल्याने बैठकीला उपस्थित राहणे अपेक्षित होते. पण या बैठकीला उपस्थित राहण्याऐवजी त्यांनी ठाणे मलंगगड महोत्सवात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पत्नीला खाऊ घातले ब्लेडचे तुकडे, पतीला न्यायालयाने सुनावली कठोर शिक्षा

न्यायाधीशांच्या अल्पवयीन मुलाच्या आलिशान कारची दुचाकीला धडक; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Itchy ears after bathing: आंघोळीनंतर तुमच्याही कानात सतत खाज येते? दुर्लक्ष करू नका, डॉक्टरांनी सांगितलं कारण

Home Cleaning Tips: दिवाळीसाठी घराची साफसफाई करायची आहे? मग, वेळ आणि मेहनत वाचवणाऱ्या ७ सोप्या टिप्स नकी फॉलो करा

SCROLL FOR NEXT