Cm Eknath Shinde  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Political News: CM शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरणार? १४ जुलैला सर्वोच्च न्यायालयात मोठ्या निर्णयाची शक्यता

Disqualification Of 16 MLA: उद्धव ठाकरे यांच्या या याचिकेवर आता १४ जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Ruchika Jadhav

प्रमोद जगताप

Supreme Court Hearing: ठाकरे गटाकडून आमदार सुनील प्रभू यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. ठाकरे गटाच्या या याचिकेवर आता १४ जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. (latest Political News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह आमदारांच्या निलंबनाबाबत दाखल असलेल्या याचिकेवर लवकर निर्णय घेण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. यासह विधानसभा अध्यक्षांना निलंबनाबाबत निर्देश द्या अशी मागणी देखील याचीकेत करण्यात आली होती.

अडीच महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याचा अधिकार दिला होता. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र करण्याबाबत योग्य तो निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मात्र या निर्णयासाठीची वेळ ठरवून देण्यात आली नव्हाती.

अशात सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश देऊन आता अडीच महिन्यांचा कालावधी झाला आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली होती.

अशात शनिवारी ठाकरे आणि शिंदे गटाच्या दोन्ही आमदारांना आपली कागदपत्रे सादर करत आपलं म्हणणं मांडण्यास विधानसभेच्या अध्यक्षांनी सांगिलं होतं. त्यावर आता १४ जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणी दरम्यान काय होणार याकडे साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : पुष्पा म्हणतो झूकेगा नाही साला, गद्दार म्हणतो उठेगा नाही साला - ठाकरेंचा शिंदेंना टोला

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने, गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT