Sunetra Pawar addressing party leaders after being announced as NCP National President at NSCI Dome, Worli. saam tv
महाराष्ट्र

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार यांच्याकडं सर्वात मोठी जबाबदारी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमतानं निवड

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांची औपचारिक घोषणा करण्यात आली. माजी अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनानंतर हे पद रिक्त झाले होते. आज वरळी येथील एनएससीआय डोम येथे पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक झाली.

Bharat Jadhav

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नवीन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची औपचारिक घोषणा करण्यात आली. ही बैठक वरळी येथील NSCI डोम येथे बोलावण्यात आली होती. माजी अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्त झाले होते. त्यानंतर सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्षा करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नावही चर्चेत होते, परंतु राज्य आणि केंद्रीय कार्यकारिणीने सुनेत्रा पवार यांच्या नावावर एकमताने सहमती दर्शवली.

प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं जावं, असा प्रस्ताव मांडला. त्यावर सर्व आमदार आणि मंत्र्यांनी हात उंचावत सहमती दर्शवली. त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा अजित पवार यांची निवड करण्यात आली. दरम्यान, पार्थ पवार यांच्याकडेही मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे.पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीला सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल, पार्थ पवार, रुपाली चाकणकर छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

अजितदादा २८ जानेवारी दिवशी आपल्यातून निघून गेले, आपल्या सर्वांसाठी ते धक्कादायक होतं. आपल्या सर्वाना प्रश्न होता उद्या आपण काय करणार, कसं करणार? पण सुनेत्राताईंच्या नेतृत्वात आपला पक्ष काम करेल, असे म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी अध्यक्षपदाचा प्रस्ताव मांडला. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. अजित पवारांनी मला राष्ट्रीय कार्याध्यक्ष केलं होतं. त्यांनी माझ्यावर एवढा मोठा विश्वास टाकला. पक्ष महाराष्ट्र आणि देशाच्या हितासाठी आम्ही काम केलं. राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून माझी आणि प्रदेश अध्यक्ष म्हणून तटकरे आणि भुजबळ मुश्रीफ आमची सर्वांची जबाबदारी होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा मतदानाला सुरूवात, 15 बुथवर का होतेय फेरमतदान ?

Maharashtra Weather : राज्याला अवकाळी पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; पुढील काही दिवस महत्त्वाचे

Ahilyanagar Tourism : कोकण कड्याची भव्यता अन् सह्याद्रीतील थरार; करा 'या' ऐतिहासिक किल्ल्याचा रोमांचक प्रवास

HSC Result 2026 Today : बारावीचा निकाल आज! संकेतस्थळाची अधिकृत यादी एका क्लिकवर, वाचा सविस्तर

Cancer Risk Unmarried: लग्न न केल्यास कॅन्सरचा धोका वाढतो? संशोधनातून धक्कादायक सत्य समोर

SCROLL FOR NEXT