Saamana Editorial On BJP SAAM TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: दीर्घ दुराव्यानंतर शिवसेना-समाजवादीची एकजुट; मुंबईतील बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब?

Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गट आणि समाजवादी पक्षाच्या युतीवर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे.

Gangappa Pujari

Maharashtra Politics:

सर्वच राजकीय पक्षांना आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणूकांचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने राजकीय वर्तुळात युत्या, आघाड्यांची लगबग सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक दशकांनंतर शिवसेना ठाकरे गट आणि समाजवादी जनता परिवार पुन्हा एकत्र येत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवसेनेमधील (Shivsena) फुटीनंतर शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट पक्षबांधणीसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. ठाकरे गटाने आपला पक्ष बळकट करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने पुन्हा समाजवादी पक्ष आणि संघटनांसोबत राजकीय वाटचाल करण्याचा निर्णय घेतला आहे.

आज (रविवार, १५ ऑक्टोंबर) मुंबईच्या एम.आय.जी. क्लबमध्ये बैठक पार पडणार असून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) साधणार समाजवादी जनता परिवाराशी संवाद साधणार आहेत. या बैठकीनंतर शिवसेना ठाकरे गट आणि समाजवादी पक्षाच्या युतीवर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे.

आजच्या बैठकीला ज्येष्ठ विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेत्यांचा समावेश आहे. कामगार नेते शशांक राव, असीम राव, जॉर्ज फर्नांडिस यांचे सहकारी सुभाष मळगी, जनता दलाचे माजी प्रदेशाध्यक्ष निहाल अहमद यांच्या कन्या शान-ए- हिंद यांची विशेष उपस्थिती असणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT