Akola Shivsena Shinde Group Leader Arrested Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिंदेसेनेच्या बड्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

Akola Shivsena Shinde Group Leader Arrested: अकोल्यामध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. शिवसेना शिंदेगटाच्या नेत्याला पोलिसांनी अटक केली. अकोल्यामध्ये भाजप- शिवसेनामधील अंतर्गत वाद चांगलाच चिघळला आहे.

Priya More

Summary -

  • अकोल्यात शिवसेना शिंदेगटाच्या नेत्याला अटक

  • सागर भारुका यांना अकोला पोलिसांनी केली अटक

  • भाजप नेते विजय अग्रवाल यांनी केली होती तक्रार दाखल

  • महापालिकेतील बैठकीतून शिवसेना- भाजपमधील वाद चिघळला

अक्षय गवळी, अकोला

अकोल्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिंदेसेनेच्या नेत्याला पोलिसांनी अटक केली. भाजपाचे स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. अकोला महापालिकेतील शिंदेंच्या शिवसेनेचे गटनेते सागर भारुका यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना काही वेळात न्यायालयात हजर केले जाणार आहे. या कारवाईमुळे शिंदेसेना आक्रमक झाली आहे. या प्रकरणामुळे अकोल्यातील भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद चांगलाच पेटल्याचे पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला महापालिकेतील भाजप आणि शिंदे गटातील राडा प्रकरणावरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते सागर भारुका यांना सिटी कोतवाली पोलिसांकडून अटक करण्यात आली. बुधवारी अकोला महापालिकेत भाजप आणि शिंदेसेनेत राडा झाला होता. शिंदेचे गटनेते सागर भारूक यांनी स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांना शिवीगाळ केली होती. तसंच ते त्यांच्या अंगावर धावून गेले होते. या घटनेमुळे महापालिकेत गोंधळ उडाला होता. बुधवारच्या वादानंतर विजय अग्रवाल यांनी सिटी कोतवाली पोलिसात सागर भारुका यांच्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी सागर भारूका यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

नेमकं प्रकरण काय?

अकोला महापालिकेत ३ दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत मोठा राडा झाला होता. स्थायी समितीच्या बैठकीत भाजपचे स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल आणि शिंदेंच्या शिवसेनेचे गटनेते सागर भारुका यांनी शिवीगाळ करत एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनंतर लगेच स्थायी समितीची सभा घेण्यात आली होती. स्थायी समिती सभागृहात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजप आणि शिंदेंची शिवसेना आमने-सामने आले होते. विकास कामांच्या दर्जावरून अग्रवाल आणि भारुका आमने-सामने आल्याने सभागृहात जोरदार वाद झाला.

बैठकीत सभापती विजय अग्रवाल यांनी भारूका यांना १५ दिवसांसाठी सभागृहातून निलंबित करण्याचे आदेश दिले होते. सभागृहाच्या बैठकीतून बाहेर काढण्याचे आदेश दिल्याने तणाव वाढला होता. विजय अग्रवाल यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप भारुका यांनी केला. स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनीही शिवीगाळ केल्याचं मान्य केलं. दरम्यान, भाजपचे गटनेते पवन महल्ले आणि पोलिसांनी मध्यस्थी करून दोघांमधील हाणामारीची घटना टळली होती.

काल पुन्हा झाला राडा...

बुधवारी महायुतीतल्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील अकोल्यात पुन्हा वाद विकोपाला गेला होता. सागर भारुका हे विजय अग्रवाल यांना मारहाण करायला धावले. दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्या स्थायी समितीत झालेल्या राड्यानंतर सागर भारुका यांना १५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले होते. या निलंबनानंतर दोन्ही पक्षांमधील धुसफुस विकोपाला गेली. बुधवारी त्याचाच राग मनात ठेवत शिंदेंच्या शिवसेनेचे गटनेते सागर भारुका आणि पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख आणि नगरसेवक मंगेश काळे यांचा महापालिकेत धुडघूस पाहायला मिळाली होती. भाजप आणि शिवसेनेमधील चिघळलेल्या वादाचा बुधवारच्या दुसरा अंकानंतर भाजपचे स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी सागर भारुका यांच्याविरोधात सिटी कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून आज सागर भारूका यांना अटक झाली. थोड्या वेळातच त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे

विशेष म्हणजे, या प्रकरणानंतर शिवसेनेचे पदाधिकारी राजेश साळवे, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह शिवसेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. विजय अग्रवाल यांच्याविरोधात सागर भारूका यांनी देखील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत हमरी तुमरी झाल्याने दोन्ही पक्षातील समन्वयावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT