Sanjay Raut On ECI saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut: शिंदे फडणवीस सरकारचं काय होणार? संजय राऊत यांनी दिल्लीमधून केले मोठे वक्तव्य

उद्या होणाऱ्या सुनावणीमध्ये सत्तासंघर्षावर तोडगा निघणार की हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात येणार हे पहावं लागणार आहे. याबाबत संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

Gangappa Pujari

Sanjay Raut: राज्याच्या राजकारणात सध्या शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील न्यायालयीन लढाई चांगलीच तापली आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी होणार आहे. पाच ऐवजी सात न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी मागील सुनावणीवेळी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. त्यामुळे उद्या होणाऱ्या सुनावणीमध्ये सत्तासंघर्षावर तोडगा निघणार की हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात येणार हे पहावं लागणार आहे.

सत्तेत असलेले शिंदे- फडणवीस सरकार घटनाबाह्य असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे (Eknath Shinde) फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी आमचा न्यायालयावर विश्वास आहे. "मोठ्या अपेक्षा सुप्रीम कोर्टाकडे पाहिलं जातं, महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार असून आमचा न्यायालयावर विश्वास असून मोठ्या अपेक्षेने सुप्रीम कोर्टाकडे पाहिले जाते," असा विश्वास व्यक्त केला आहे.

त्याचबरोबर यावेळी" राज्यात राज्याच्या राजकारणात द्वेष, सूडाचे राजकारण पाहायला मिळत आहे. अशा प्रकारचे राजकारण गेल्या 40 वर्षात झालं नव्हते असे म्हणत राजकीय मतभेद होतात परंतु कटूता संपवायला फडणवीस पुढे येणार असतील तर महाराष्ट्र स्वागत करेल," असेही सुचक वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र गाडीतून प्रवास केला होता. याबद्दल बोलताना राऊत यांनी "शरद पवार देशातले महत्त्वाचे आणि मोठे नेते आहेत. त आम्ही त्यांचा आदर सन्मान करतो शरद पवार यांच्याशी कोणी कटुता ठेवू शकत नाही," अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT