Maharashtra Politics Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'मोदी पुन्हा आले तर देश...', बाळासाहेबांच्या विधानाची आठवण करून देत राऊतांची थेट नरेंद्र मोदींवर टीका

Maharashtra Politics: बाळासाहेब ठाकरे यांनी गुजरात निवडणुकांवेळी "मोदी गया तो गुजरात गया," असं म्हणतं मोदींवर विश्वास दाखवला होता. मात्र आज याउलट परिस्थिती असून "आता मोदी आया तो देश गया" अशी स्थिती असल्याची थेट टीका संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.

Sandeep Gawade

Maharashtra Politics

बाळासाहेब ठाकरे यांनी गुजरात निवडणुकांवेळी "मोदी गया तो गुजरात गया," असं म्हणतं मोदींवर विश्वास दाखवला होता. मात्र आज याउलट परिस्थिती असून "आता मोदी आया तो देश गया" अशी स्थिती असल्याची थेट टीका संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत सोलापूर दौऱ्यावर असून त्यांनी मोदी आणि अमित शहांवर सटकून टीका केली.

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून काढून टाकाण्याचे काम गुजरातच्या लॉबीने केलं. जेव्हा गुजरात, उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाकाळात मृत्युचे खच पडत होते, तेव्हा उद्धव ठाकरे लोकांचे जीव वाचवत होते. त्यांची लोकप्रियता यांनी खुपली म्हणून त्यांनी सरकार पाडलं. ज्यांनी माझ्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खूपसला त्याच खंजिराने यांचा कोतळा काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शरद पवार समोर बसलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा हा प्रश्न निवडणूक आयोगाला पडला. देशातील लोकशाही व्यवस्था संपत चालली आहे, हे आता जनतेच्या लक्षात येत आहे. त्यामुळे देशातील कोणत्याही एका राज्यात बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन आव्हानही त्यांनी यावेळी सरकारला दिलं.

राम मंदिरावर बोलताना संजय राऊत म्हणाले, राम सगळ्यांचा आहे. केवळ भाजपचा नाही. ते रामाचे मालक नाहीत. पण त्यांनी रामाच्या नावाने राजकारण सुरू केले आहे. आज ज्या ठिकाणी राम मंदिर बनत आहे तिथे शिवसैनिक घुसले नसते तर आज राम मंदिर उभं राहिलं नसतं असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संगमनेरमध्ये पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त

Split Ends Care : कितीही काळजी घेतली तरी केसांना फाटे फुटतात? मग हे ७ उपाय नक्की करून पाहा!

Urine Infection : फक्त युरिन इन्फेक्शन नाही, महिलांना पावसाळ्यात सर्वाधिक धोका असतो 'या' आजारांचा

Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; राहत्या घरी आढळला मृतावस्थेत, मनोरंजन विश्वात हळहळ

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय बॉक्सर्सचा ऐतिहासिक पराक्रम; एकाच दिवसात पटकावली १० पदके

SCROLL FOR NEXT