Deputy CM Ajit Pawar  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'शरद पवार माझे दैवत'; अजित पवारांचं वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Ajit Pawar Statement On Sharad Pawar: शरद पवार हे माझे दैवत, असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. मात्र हे अजित पवारांचं शरद पवारांवरचं प्रेम आहे की त्यांनी एकाच दगडात दोन निशाणे साधलेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Bharat Mohalkar

राष्ट्रवादीच्या फुटीला दीड वर्ष झालंय, पण अजित पवारांच्या मनातून शरद पवारांवरचं प्रेम काही कमी होताना दिसत नाही. त्याला कारण ठरलंय अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये अण्णा बनसोडेंच्या सत्कार समारंभात शरद पवारांचा दैवत असा केलेला उल्लेख. त्यामुळे अजित पवार एका दगडात दोन पक्षी तर मारत नाहीत ना या चर्चांनी जोर धरलाय.

2023 मध्ये राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्यात राजकीय संघर्ष टोकाला गेला होता. त्यातच लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत पवार कुटुंब आमने-सामने आलं होतं. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांचे सूर बदललेत. त्यांनी बीडमधील सभेतही चुलत्यांच्या कृपेने सगळं काही ठीक असल्याचं सांगितलं. तर हाच धागा पकडून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनीही अजित पवारांना टोला लगावलाय.

दुसरीकडे विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार आणि शरद पवारांमधील जवळीक वाढत चाललीय.

काका-पुतण्या भेटी-गाठी

12 डिसेंबर 2024

वाढदिवसानिमित्त शरद पवारांच्या निवासस्थानी दिल्लीत भेट

23 जानेवारी 2025

पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भेट आणि अर्धा तास बंद दाराआड चर्चा

27 जानेवारी 2025

तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अजित पवारांचा शरद पवारांना फोन

22 मार्च 2025

अजित पवार आणि शरद पवार बैठकीसाठी एकत्र

अजित पवारांचा मुलगा जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा होणार आहे.. त्याआधीच अजित पवारांनी टायमिंग साधलंय. एवढंच नाही तर शरद पवारांचा दैवत असा उल्लेख करतानाच अजित पवारांनी मोदींचाही उदोउदो केलाय. त्यामुळे अजित पवार शरद पवारांसोबत भावनिक तर मोदींचं कौतूक करत राजकीय नातं जपण्याचा प्रयत्न करत एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचं म्हटलं जातंय. मात्र अजित पवारांचं वक्तव्य काकांच्या प्रेमातून की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या रणनीतीतून? हा प्रश्न कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT