Jayant Patil Comment On BJP Joining  saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: नाराजी, राजीनामा अन् भाजप प्रवेश? जयंत पाटलांनी स्पष्टचं सांगितलं

Jayant Patil Comment On BJP Joining : राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप प्रवेशावर भाष्य केलंय. गेल्या काही दिवसांपासून भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत.

Bharat Jadhav

राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षात जयंत पाटील नाराज आहेत. त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला, अशी चर्चा आहे. त्यानंतर राज्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी त्यांच्या बाबत मोठा दावा केला. जयंत पाटील हे त्यांच्या पक्षात स्पष्टपणे नाराज आहेत. ते माझ्या संपर्कात नेहमी असतात असं विधान महाजन यांनी केलं होतं.

त्यानंतर जयंत पाटील भाजपमध्ये जाणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली. यावर आता खुद्द जयंत पाटील यांनी स्पष्टपणे सांगत अनेकांचा संभ्रम दूर केलाय. मंत्रिमंडळात त्यांच्या वजनाचं खातं नसल्यानं जयंत पाटील यांचा भाजप प्रवेश थांबल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. परंतु महाजन यांच्या दाव्यामुळे जयंत पाटील पक्षांतर करणार या चर्चेला पुन्हा पेव फुटले. आज जयंत पाटील यांनी त्यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांबाबत खुलासा दिलंय.

भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना कोणी विचारलं नाही ना त्यांनी कोणाकडे विनंती केली. एखाद्या प्रदेशाध्यक्षाबाबत खूप साऱ्या वावड्या उठवल्या जात आहेत. मी कुठल्या पक्षात जात आहे हे तुम्हीच ठरवायला लागला आहात. कोणी कोणासोबत बोललं तरी त्याची बातमी होत आहे.

एखाद्या कामासाठी दुसऱ्या कोणाला भेटलो तरी त्याची चर्चा होते. पण तशी कोणतीही परिस्थिती नाहीये. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आहे. मी त्या पक्षाचे काम करतोय. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळे चर्चांवर मी प्रतिक्रिया देत नाही कारण, अशा बातम्या सारख्याच येत असतात.

भाजपमधील प्रमुख नेत्यांचे आणि माझे चांगले संबंध आहेत. व्यक्तिगत वैरत्व मी कधी कोणाशी करत नाही," पण भाजपाने माझ्याशी कधीही संपर्क साधलेला नाही, असंही जयंत पाटील म्हणालेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना जयंत पाटील यांनी अध्यक्षपद सोडण्याचे आणि नवीन चेहऱ्याला संधी देण्याचे संकेत दिले होते. शरद पवारही जयंत पाटील यांच्या भूमिकेवर सकात्मक होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT