Shambhuraj Desai On Manoj Jarange Saam Tv
महाराष्ट्र

Shambhuraj Desai: मनोज जरांगेंनी संयम बाळगावा, लोकांना वेठीस धरणे थांबवा; मंत्री शंभूराज देसाईंचा सल्ला

Shambhuraj Desai On Manoj jarange Patil: घाई गडबडीत निर्णय घेतला तर पुढे जाऊन तोटा होईल. गेले सात आठ महिने अभ्यास करतोय, जरांगे पाटील यांनी संयम बाळगावा, असे शंभूराज देसाई म्हणाले.

Gangappa Pujari

सचिन गाड, मुंबई|ता. २२ फेब्रुवारी २०२४

Shambhuraj Desai News:

मराठा आरक्षणाचे विधेयक अधिवेशनात मंजूर झाल्यानंतरही मनोज जरांगे पाटील हे आपल्या उपोषणावर ठाम आहेत. सगेसोयऱ्याबाबतचा अध्यादेश निघेपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. अशातच जरांगे पाटील यांच्या जुन्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केल्याने नवा वाद उभा राहिला आहे. यावरुनच शिवसेना शिंदे गटाचे नेते, राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी जरांगेंना आंदोलन न करण्याचा सल्ला दिला आहे.

काय म्हणाले शंभूराज देसाई?

"आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर झाले आहे. शैक्षणिक आणि नोकऱ्यांचा प्रश्न सुटला आहे. सगेसोऱ्येच्या अध्यादेशावर 6 लाखांपेक्षा जास्त हरकती आल्या आहेत. घाई गडबडीत निर्णय घेतला तर पुढे जाऊन तोटा होईल. गेले सात आठ महिने अभ्यास करतोय, जरांगे पाटील यांनी संयम बाळगावा, असा सल्ला देत वयस्कर माणसांना उपोषणाला बसवून तुम्ही वेठीस धरताय का?" असा सवाल शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी उपस्थित केला आहे.

तसेच "अजय बारस्कर हे आंदोलनात त्यांच्या सोबत होते. या यांच्या अंतर्गत गोष्टी आहेत सरकारचा याच्याशी काही संबंध नाही. काही तक्रार केली तर सरकार दाखल घेईल. एकेक गोष्टी बाहेर येत आहेत. जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी नकारार्थी विचार थांबवावा, सरकारची यंत्रणा मोठी आहे ट्रॅप लावण्याची गरज नाही," असेही शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

३ मार्चपासून मोठे आंदोलन..

दरम्यान, २९ फेब्रुवारीपासून मोठे आंदोलन होणार आहे. तसेच ३ मार्च रोजी राज्यातील सर्वात मोठे रास्ता रोको आंदोलन होणार आहे. यामुळे या दिवशी सकाळी लग्न लावू नका, सकाळीची वेळी असणारे लग्न संध्याकाळी करा, असा इशारा देत मनोज जरांगे पाटील यांनी मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : कामाची बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात मोठी वाढ? सरकार लागू करू शकतं हा फॉर्म्यूला

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

Helmet importance: बाईकवर फिरायला जाण्यापूर्वी हेल्मेटबाबत ही एक चूक टाळा

SCROLL FOR NEXT