Sanjay Shirsat On Sanjay Raut Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'रामनामाचा आम्ही निवडणुकीत फायदा घेऊ अन् फायदाही होईल...' शिंदे गटाने राऊतांना सुनावले

Sanjay Shirsat On Sanjay Raut: आम्ही सुद्धा दर्शनाला येत्या काही दिवसात जाणार आहे. मात्र काही काळे मांजर आडवे जात आहे. फालतू प्रश्न उबाठा गटाचे नेते उपस्थित करत आहेत, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.

Gangappa Pujari

राम ढाकणे, छत्रपती संभाजीनगर|ता. २२ जानेवारी २०२४

Sanjay Shirasat press Conference:

देशभरात राममंदिर उद्घाटन सोहळ्याचा जल्लोष अन् उत्साह पाहायला मिळतोय. या सोहळ्यावरुन राजकीय वातावरणही चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून भाजप या सोहळ्याचे राजकारण करत असल्याचा आरोप वारंवार केला जात आहे. खासदार संजय राऊत यांनीही यावरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. संजय राऊत यांच्या या आरोपांना आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उत्तर दिले आहे.

काय म्हणाले संजय शिरसाट?

"अयोध्येत प्राणप्रतिष्ठा होत आहे त्यामुळे देशभरात आनंदोत्सव होत आहे. आम्ही सुद्धा दर्शनाला येत्या काही दिवसात जाणार आहे. मात्र काही काळे मांजर आडवे जात आहे. फालतू प्रश्न उबाठा गटाचे नेते उपस्थित करत आहेत. तिकडे आरती चालली म्हणून हे नाशिकमध्ये आरती करत आहेत. स्वतःला विधवान समजणारे रामावर प्रश्न विचारत आहे. रामाने मुक्काम केला तिथंच तुमचा शेवट होणार आहे," अशी टीका संजय शिरसाट यांनी यावेळी केली.

हा इव्हेंट नाही, आनंदोत्सव..

यावेळी बोलताना संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर जोरदार पलटवार केला. मोदींनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बाळासाहेबांची मंदिराबद्दल भूमिका नाकारता येणार नाही. पण यांना वाटतं आम्हाला डोक्यावर घेऊन नाचावं पण आम्ही यांना का महत्व द्यायचं? हा इव्हेंट नाही आनंदोत्सव आहे, असा टोला त्यांनी लगावलं.

तुमच्या पोटात का दुखतय? राऊतांना सवाल.

दरम्यान, संजय राऊत यांनी राममंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप लोकसभेची तयारी करत असल्याची टीका केली होती. राऊतांच्या या टिकेवरुनही संजय शिरसाट यांनी सडेतोड उत्तर दिले. 'आमची निवडणुकीची तयारी आहे तुमच्या पोटात का दुखतयं. यांनी मराठी माणसाची काहीच केलं नाही तरी मराठी माणसासाठी हे बोलतात,' असा टोला त्यांनी लगावला.

फायदा घेतल्यास गैर काय?

तसेच "यांनी आधी घर सांभाळावे यांना घर सांभाळता आले नाही. राम नामाचा आम्ही निवडणुकीत घेऊ फायदा आणि त्याचा फायदा सुद्धा होईल, जो काम करतोय त्याने फायदा घेतल्यास गैर काय?" असा सवालही संजय शिरसाट यांनी उपस्थित केला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna: महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हमरी तुमरी

भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलाय; रविंद्र चव्हाणांनी सांगितला पक्षाचा इतिहास

Nanded Crime: सोनू कल्याणकरच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट; हत्येमागील धक्कादायक कारण आलं समोर

PM Kisan yojana : ही गोष्ट केली तरच पीएम किसान योजनेचा हफ्ता मिळणार, शेतकर्‍यांच्या कामाची गोष्ट

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच लक्ष्मण हाकेंच्या माघारीनंतरही नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT