Sanjay Raut Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut News: 'महाराष्ट्र अस्वस्थ, आरक्षणावरुन मंत्रीमंडळातील नेत्यांमध्ये गँगवॉर सुरू...' संजय राऊतांचे गंभीर आरोप

Saniay Raut On Maratha Aarkshan: महाराष्ट्र सध्या अस्वस्थ आहे. जातीपातीच्या राजकारणात महाराष्ट्र कधीच अडकला नव्हता... असे संजय राऊत म्हणालेत.

Gangappa Pujari

प्रमोद जगताप, प्रतिनिधी

Maharashtra Politics:

राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन वातावरण चांगलेच तापले आहे. या मुद्द्यावरुन राज्यात ओबीसी आणि मराठा असा संघर्ष पाहायला मिळतोय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर टीका केल्यानंतर भुजबळांनीही जरांगे पाटील यांच्यावर जाहीर सभेतून हल्लाबोल केला. आरक्षणाच्या प्रश्नांवरुन ठाकरे गटाचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचे खासदार संजय राऊतांनी सांगितले आहे.

आरक्षणावरुन संजय राऊतांची टीका...

राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आणि ओबीसींमध्ये संघर्ष सुरू आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी एल्गार रॅलीतून जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. यावर बोलताना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

"महाराष्ट्र सध्या अस्वस्थ आहे. जातीपातीच्या राजकारणात महाराष्ट्र कधीच अडकला नव्हता. राज्यातील नेत्यांमध्ये दोन गट पडले आहेत राज्याच्या मंत्रिमंडळात गँगवार सुरू आहे. हे आधीही बोललो होतो. त्यावेळी माझ्यावर टीका केली पण ते खरं आहे.. असे संजय राऊत म्हणालेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ठाकरे गटाचे शिष्टमंडळ घेणार राष्ट्रपतींची भेट..

"मराठा आणि धनगर आरक्षणाच्या प्रश्नांसाठी ठाकरे गटाचे शिष्टमंडळ राष्ट्रपती द्रौपती मुर्मुम यांची भेट घेणार असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले आहे. संसदेचे विशेष अधिवेशन राष्ट्रपती यांनी बोलावून किंवा उद्या होणाऱ्या अधिवेशनात आरक्षणाचा कोटा 50 टक्के करावा.." अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भोंदू अशोक खरातला १४ दिवसांचा न्यायलयीन कोठडी

ग्रामीण भागातील लाडक्या बहिणींसाठी सरकारने आणली जबरदस्त योजना; आता महिलांना मिळणार २४ लाख रुपये

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल; २४k, २२k, १८k सोन्याची प्रति तोळा किती किंमत? वाचा ताजे दर

IPL 2026: 1...2...3 नाही तर तब्बल 11 चेंडू; अर्शदीप सिंगने हद्दच केली, फेकली सर्वात मोठी ओव्हर

Dhurandhar 2 Box Office: बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंहचा जलवा; 'धुरंधर २' ची १३ दिवसात १५०० कल्बमध्ये एन्ट्री

SCROLL FOR NEXT