Maharashtra Politics Sanjay Raut |Chhagan Bhujbal 
महाराष्ट्र

Sanjay Raut: 'छगन भुजबळ मोठे कलाकार, रंग बदलून नाट्य निर्माण करण्यात माहिर', संजय राऊतांचा खोचक टोला!

Maharashtra Politics Sanjay Raut On Chhagan Bhujal: अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. यावरुन बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सर्वात महत्वाचे विधान केले असून छगन भुजबळ हे कलाकार आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे.

Gangappa Pujari

मयूर राणे, ता. १८ जुलै २०२४

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी अचानक शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळामध्ये उलट-सुलट चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. याभेटीवरुन बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सर्वात महत्वाचे विधान केले असून छगन भुजबळ हे कलाकार आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

"छगन भुजबळ साहेब हे मोठे कलाकार आहेत. त्यांनी चित्रपटातही काम केले आहे. अनेकदा आपलं रंगरुप बदलून नाट्य निर्माण करण्यात छगन भुजबळ माहिर आहेत. भुजबळ साहेब का गेले? कसे गेले? त्याने महाराष्ट्राच्या राजकारणात कसा गोंधळ झाला हे सर्वांना माहित आहे. मात्र शरद पवार हे सर्वात मोठे नटसम्राट आहेत. त्यांना देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात प्रतिष्ठा आहे, पुढे पुढे काय होतयं बघा," असे सूचक विधानही राऊत यांनी केले.

"विधानसभेच्या जागा वाटपावरुनही संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले. जागा वाटपाबाबत अद्याप काहीही ठरलेलं नाही. आम्ही २८८ जागांसाठी चाचपणी करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसही २८८ जागांचा अभ्यास करत आहे. हा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर आम्ही तिघे एकत्र बसू आणि त्यानंतर कुठे, किती, कशा जागा लढायच्या ते ठरवू," असं राऊत म्हणाले.

"लोकसभेच्या निवडणुका हारल्यावर लाडका भाऊ, लाडकी बहीण, लाडका छोटा, भाऊ लाडका मोठा भाऊ हे सगळं त्यांना आठवायला लागलं. विरोधकांनी टीका केलेले नाही, विरोधकांनी सरकारी पैशातून एकंदरीत जे राजकारण सुरू आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहे. लाडक्या बहिणीला फक्त पंधराशे रुपये आणि लाडक्या भावांना 6000, पदवीधरांना दहा हजार, खरी गरज लाडक्या बहिणींना आहे अशी आमची भूमिका आहे, असं संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT