Sanjay Jadhav’s possible exit sparks political buzz in Maharashtra. saam tv
महाराष्ट्र

परभणीचे खासदार संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार? ठाकरे गटानं दिली महत्त्वाची अपडेट

Maharashtra Politics: खासदार संजय जाधव ठाकरे गट सोडण्याच्या शक्यतेबाबत चर्चा वाढत आहे. महाराष्ट्रातील वाढत्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर पक्षनेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Bharat Jadhav

दिल्लीमधील आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढासह सात खासदारांनी पक्षाला रामराम ठोकल्यानं दिल्लीत मोठा राजकीय भूकंप झाला. त्यानंतर आता महाराष्ट्रातील इतर विरोधी पक्षांना पक्ष फुटीची चिंता सतावत आहे. आपमधील फुटीनंतर आता राज्यातील एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे.

दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चेने जोर धरला. संजय जाधव हे ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देतील अशी चर्चा होण्याचं कारण काय? जाधवबाबत ठाकरे गटाने काय प्रतिक्रिया दिली आहे, हे जाणून घेऊ.

दिल्लीमधील राजकीय भूकंपानंतर राज्यातील ठाकरे गटातही भूकंप होणार असल्याची चर्चा होतेय. त्याच कारण म्हणजे उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलवलेल्या बैठकीला खासदार संजय जाधव यांनी दांडी मारली होती. परभणी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती. परभणी जिल्ह्याला खासदारांच्या गद्दारीची परंपरा असल्यानं संजय जाधव यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, संजय जाधव भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा पू्र्णपणे अफवा आहे. संजय जाधव पक्षसोबतच आहेत. कार्यकर्त्यांनी त्या चर्चांकडे लक्ष देऊ नये. कार्यकर्त्यांनी पक्षबांधणीचे काम करावे. २०२९निवडणूक पर्यंत संघटना मजबूत बनवायची आहे, अशा सुचना उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पोलादपुर महाबळेश्वर जोडणारा आंबेनळी घाट 16 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार

TET Exam Scam: टीईटी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, नामांकित पोलिस प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्याला अटक

Lanja Tourism : पावसाळ्यातील नंदनवन! लांजाजवळील 'या' ठिकाणी घ्या निसर्गाचा मनमुराद आनंद

Mirzapur The Film: मिर्झापूरच्या गादीसाठी पुन्हा रंगणार थरार; मुन्ना भैय्यासह 'ही' जुनी पात्रं करणार कमबॅक

Wednesday Horoscope : घरातले वातावरण शांत ठेवा, ७ राशींच्या व्यक्तींची होणार चांदीच चांदी; वाचा बुधवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT