Sadabhau Khot News Saamtv
महाराष्ट्र

Sadabhau Khot: 'हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या...' सदाभाऊ खोत यांची मागणी; शिंदे गटाचं टेन्शन वाढलं

Loksabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी,अशी थेट मागणी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी जाहीर मेळाव्यातुन केली आहे आहे.

विजय पाटील

Maharashtra Politics:

राजकीय वर्तुळात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभा निवडणुकांसाठी अनेक बडे नेते इच्छुक असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आगामी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी,अशी थेट मागणी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी जाहीर मेळाव्यातुन केली आहे आहे.

लोकसभा निवडणूक लढवण्याची (Loksabha Election 2024) इच्छा व्यक्त करत सदाभाऊ खोत यांनी जाहीर मेळाव्यातून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे हातकणंगलेमधून उमेदवारी मागितली. गत लोकसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळणार होते. मात्र ऐनवेळी हा मतदार संघ शिवसेनेच्या वाटेला गेला, असं स्पष्ट करत यावेळी लोकसभा निवडणुक लढवण्याची स्पष्ट भूमिका खोत यांनी जाहीर केली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि महायुतीतील घटक पक्षांच्या उपस्थितीमध्ये सांगलीच्या इस्लामपूर आयोजित शेतकरी कामगार परिषद पार पडला. यावेळी सदाभाऊ खोत यांनी ही मागणी केली. विशेष म्हणजे व्यासपीठावर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने देखील उपस्थित होते. यावेळी खासदार माने यांना पैरा फेडण्याची आठवण देखील खोत यांनी करून दिली.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी अखेर भाजपकडून उमेदवार निश्चित करण्यात आला आहे. या जागेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडणुकीला उभे राहणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. तसेच केंद्रीय नेतृत्वाचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी राणेंना तयारीला लागण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला बायकोने नवऱ्याला का ओवाळावे? जाणून घ्या जुनं शास्त्र

Diwali Photo Tips: दिवाळीत फोटो कसे क्लिक करावे? प्रोफेशनल लुकसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स

Thamma OTT Release : रश्मिकाचा 'थामा' चित्रपट ओटीटीवर कुठे अन् कधी पाहता येणार? वाचा अपडेट

Prevent Heart Attack: रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज होतील दूर, टळेल हार्ट अटॅकचा धोका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Maharashtra Live News Update: नाशिकच्या पंचवटी परिसरात टवाळखोरांचा धुडगूस, वाहनांची तोडफोड

SCROLL FOR NEXT