Sadabhau Khot On Sharad Pawar Saam tv
महाराष्ट्र

Sadabhau Khot On Sharad Pawar: शरद पवारांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या सदाभाऊ खोत यांची दिलगिरी

Sadabhau Khot Apologizes: सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्या शारीरिक व्यंगावरून टीका केली. सदाभाऊ खोत यांची जीभ घसरल्यानंतर त्यांच्यावर महाविकास आघाडीकडून जोरदार टीका केली जात आहे.

Priya More

महायुतीमधील घटक पक्षाचे नेते आणि शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्या शारीरिक व्यंगावरून टीका केली. सदाभाऊ खोत यांची जीभ घसरल्यानंतर त्यांच्यावर महाविकास आघाडीकडून जोरदार टीका केली जात आहे. अशामध्ये आता सदाभाऊ खोत यांनी या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. 'भाषणात शरद पवार यांच्यावर बोलताना मी जी भाषा वापरली ती गावगड्याची भाषा आहे. या भाषेमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.', असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सदाभाऊ खोत यांची पुण्यातील आज पत्रकार परिषद होणार होती. पण ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे. ⁠आज होणारी पत्रकार परीषद पुढे ढकलण्यात आली आहे. ⁠आधीच्या पुर्वनियोजीत कार्यक्रमांमुळे आजची पत्रकार परीषद घेणार नसल्याची सदाभाऊ खोत यांच्याकडून माहिती देण्यात आली आहे. ⁠सदाभाऊ खोत यांची आज दुपारी १२ वाजता पुण्यातील महायुतीच्या पश्चिम महाराष्ट्र माध्यम केंद्रात पत्रकार परिषद होणार होती. ⁠पुणे शहर राष्ट्रवादी कॅाग्रेसने ही पत्रकार परीषद उधळून लावण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आली.

तर, शरद पवार यांच्या शारीरिक अवयवावर बोलल्यामुळे सदाभाऊ खोत यांच्यावर गुन्हा दखल करून अटक करा, अशी मागणी राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सचिन खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे. 'सदाभाऊ खोत एका सभेत बोलताना राज्याचे नेते आदरणीय शरद पवार यांच्याबद्दल बोलताना अत्यंत चुकीच्या शब्दाचा वापर केला आहे. सदाभाऊ खोत यांनी आदरणीय शरद पवार यांच्या शारीरिक अवयवाबद्दल बोलले आहे. सदाभाऊ खोत कोणत्याही व्यक्तीच्या अवयवाबद्दल बोलणं हा गुन्हा आहे. तुम्हाला जनाची नाही तर मनाची सुद्धा लाज राहिली नाही. परंतु आम्ही मागणी करत आहे असं चुकीचं वक्तव्य केल्यामुळे सदाभाऊ खोत यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावा.', असे सचिन खरात यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Life: हेल्दी राहण्यासाठी आहारात करा 'या' फायबरयुक्त पदार्थांचा समावेश

IND vs SA: पहिल्या टी-२० साठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११! हा खतरनाक ऑलराऊंडर पदार्पण करणार

Old Clothes: जुने कपडे दुसऱ्यांना देतायत?तर या वास्तू टीप्स फॉ़लो करा, अन्यथा...

Sonakshi Sinha: सोनाक्षीच्या लाल ड्रेसने चाहत्यांना केलं घायाळ; सिंपल लूकची होतेय चर्चा

Shani Gochar 2024: देव दिवाळीनंतर 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार शनीदेवाचा आशीर्वाद; नशीबाचे दरवाजे उघडणार

SCROLL FOR NEXT