Rohit Pawar Against Jai Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : कर्जत-जामखेडमध्ये 'पवार विरुद्ध पवार'? रोहित पवारांनी काय सांगितलं, पाहा VIDEO

Rohit Pawar Against Jai Pawar In karjat Jamkhed : अहमदनगरमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप विरूद्ध शरद पवार गट असा सामना रंगला होता. त्यानंतर आता कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीत शरद पवार गट विरूद्ध अजित पवार गट, अशी लढत होण्याची शक्यता आहे.

Rohini Gudaghe

सुशील थोरात, साम टीव्ही अहमदनगर

राज्यामध्ये आता विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार घोषित करण्यास सुरूवात केलीय. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर वातावरण फारचं बददलं. यंदा विधानसभेत शिवसेना शिंदे गट विरूद्ध ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार विरूद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. दरम्यान शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी स्वतःच्या मतदारसंघात जय पवार यांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत.

कर्जत जामखेडमध्ये 'पवार विरूद्ध पवार'

जामखेड कर्जत मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून रक्षाबंधनाचा कार्यक्रम पाटेगाव येथे घेण्यात आला (Maharashtra Politics) होता. या कार्यक्रमाला जवळपास तीस हजारपेक्षा जास्त महिला भगिनी उपस्थित होत्या. यावेळी भाषणात बोलताना रोहित पवार यांनी जय पवार यांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता कर्जत जामखेडमध्ये 'पवार विरूद्ध पवार' असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

रोहित पवार काय म्हणाले?

रोहित पवार यांनी भाषणात सांगितलं की, आगामी विधानसभेसाठी माझ्या विरोधात मोठी ताकद या मतदारसंघात उतरणार आहे. थेट दिल्लीवरून माझ्या विरोधात प्रचारासाठी लोक येणार (Rohit Pawar Against Jai Pawar) आहेत. त्यामुळे तुम्ही माझ्याबरोबर राहणार का? असा प्रश्नही पवार यांनी उपस्थित महिलांना विचारला. विरोधी पक्ष तुम्हाला निवडणुकीच्या काळात दारू आणि पाचशे रुपये देतात. मात्र, पाचशे रुपये म्हणजे महिन्याला दहा पैश्याप्रमाणे तुम्हाला पैसे भेटत असतील, तर विकास कसा होणार? असा प्रश्नही त्यांनी केलाय.

विजयाचा गुलाल कोण उधळणार?

रोहित पवार यांनी महिला भगिनींना विकासासाठी माझ्याबरोबर राहा, मला साथ द्या असा आवाहन देखील (Vidhan sabha election) केलंय. रोहित पवार हे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये अहमदनगरमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी दणक्यात विजयाचा गुलाल उधळला (Sharad Pawar vs Ajit Pawar) होता. नुकतंच जय पवार यांनी कर्जत जामखेडचा दौरा देखील केला होता. त्यामुळे यंदा विधानसभेच्या रिंगणात कर्जत जामखेडमध्ये 'पवार विरूद्ध पवार' लढत होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG New Rule: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून LPG च्या नियमात मोठा बदल, 'या' नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

SCROLL FOR NEXT