Rajan Teli Criticized Narayan Rane Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

Rajan Teli Criticized Narayan Rane: राजन तेली यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर ते आज शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहे. नुकताच राजन तेलींनी भाजप सोडण्यामागचं कारण सांगितलं.

Priya More

Maharashtra Politics News: 'राणे कुटुंबियांकडून होत असलेल्या खच्चीकरणामुळे भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला', असा धक्कादायक खुलासा भाजपचे नेते आणि माजी आमदार राजन तेली यांनी केला आहे. राजन तेली यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर ते आज शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहे. आज संध्याकाळी मातोश्रीवर ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहे.

भाजपचे सावंतवाडी मतदारसंघ प्रमुख राजन तेलीनी भाजप सदस्यत्वाचा राजिनामा दिल्यानंतर आता त्यांनी सावंतवाडीतील आपल्या कार्यालयातील भाजप नेत्यांचे फोटो आणि बॅनर हटवले आहे. त्याठिकाणी आता स्वर्गिय बाबासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो कार्यालयात लावण्यात आले आहेत. त्यामुळे राजन तेली हे ठाकरे शिवसेनेत जाणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. राजन तेली यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश करण्यापूर्वी भाजप सोडण्यामागचे कारण देखील सांगितले आहे. यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्या कुटुंबीयांवर निशाणा साधला.

राजन तेली यांनी दावा केला की, 'एकाच कुटुंबाला एक लोकसभा, दोन विधानसभा आणि त्यांच्याच कलेने तिसरी विधानसभा उमेदवारी देणे मला योग्य वाटत नाही. घराणेशाही मला मान्य नाही. राणे कुटुंबीयांकडून होत असलेल्या खच्चीकरणामुळे आपण भाजप सोडत आहोत.' ठाकरे सेनेची मशाल हाती घेत असलेल्या माजी आमदार राजन तेली यांनी आपल्या भाजप सदस्य पदाचा तसेच विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा भाजपच्या वरिष्ठांकडे दिला आहे. 'आपण पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केला. परंतु राणे कुटुंबियांकडून आपल्यावर वारंवार अन्याय करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे आपण हा निर्णय घेत आहे.', असे त्यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: खुशखबर! या लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹६००० जमा होणार; ४ महिन्याचा हप्ता एकत्र येणार?

Kumbha Rashi: कुंभ राशी असणाऱ्या व्यक्तींचा आजचा दिवस कसा असणार? वाचा खास राशीभविष्य

Brocoli Salad Recipe: हेल्दी आणि टेस्टी ब्रोकोली सॅलड कसा बनवायचा?

Dhurandhar 2: 'धुरंधर: द रिव्हेंज'चा क्लायमॅक्स बदलला! 'जसकिरत'ला मिळाला नवा शेवट

Ashok Kharat: अशोक खरात खायचा शक्तिवर्धक गोळ्या, अतिसेवनामुळे अर्धांगवायूचा झटका; तपासातून धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT