Rajan Salvi and Uddhav Thackeray  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ठरलं तर मग! राजन साळवी ठाकरे गटाची साथ सोडणार, उद्या धनुष्यबाण हाती घेणार

Rajan Salvi and Uddhav Thackeray: कोकणामध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. ठाकरे गटाचे निष्ठावान नेते राजन साळवी पक्षाची साथ सोडत उद्या शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत.

Priya More

राज्याच्या राजकारणात अनेक वेगवान घडामोडी घडत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. नाराज राजन साळवी लवकरच उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते ठाकरे गटाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. पण आता त्यांनी निर्णय घेतला आहे. राजन साळवी उद्या शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कोकणामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे निष्ठावान माजी आमदार राजन साळवी पक्षाला सोडचिठ्ठी देणार आहेत. राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशाची तारीख जवळपास निच्छित झाल्याची माहित सुत्रांनी दिली आहे. राजन साळवी उद्या शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ते शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यातील आनंद आश्रम येथे राजन साळवी धनुष्यबाण हाती घेत शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. उद्या दुपारी ३ वाजता आनंदाश्रम येथे त्यांचा पक्षप्रवेश होणार आहेत. मशाल सोडून राजन साळवी धनुष्यबाण हाती घेणार आहेत. राजन साळवी यांच्यासोबत पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. राजन साळवी भाजपमध्ये जाणार हे जवळपास निश्चित झाले होते. भाजप नेत्यांसोबत तशा चर्चा देखील झाल्या होत्या. भाजपकडून राजन साळवी यांना वेटिंगवर ठेवण्यात आले होते. राजन साळवी भाजपमध्ये जात असल्याने शिवसेना ठाकरे गटाने त्यांचे परतीची दारं बंद केली होती. त्यामुळे राजन साळवी सध्या ठाकरे गटात फारसे सक्रिय दिसत नाहीत. आता राजन साळवी हे भाजपमध्ये नाही तर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prolonged sitting: तासन्‌तास एकाच जागी बसून राहता? सावधान! कॅन्सरमुळे मृत्यूचा धोका वाढत असल्याचा संशोधनातून धक्कादायक खुलासा

Gold Rate Today: सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण, १ तोळ्यासाठी किती मोजावे लागणार? वाचा 18k- 22k आणि 24kचे दर

Chanakya Niti: कमी वेळेत श्रीमंत कसं बनाल? आचार्य चाणक्यांनी सांगितलाय मार्ग

Bribe Case : कोकणात खळबळ! बड्या अधिकाऱ्याने NOC साठी मागितली खड्याची अंगठी; असा अडकला ACB च्या जाळ्यात

Kidney Damage : किडनी खराब होण्याआधी डोळे देतात 'हे' ५ संकेत, दुर्लक्ष करू नका नाहीतर...

SCROLL FOR NEXT