Raj Thackeray saam tv
महाराष्ट्र

Raj Thackeray: 'मी गंगेचं पाणी पिणार नाही', कुंभस्नानाची राज ठाकरेंकडून खिल्ली

Raj Thackeray On Maha Kumbh Mela: राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील स्नानावर टीका केली असून, त्यांच्या विधानामुळे श्रद्धेच्या विश्वातून त्यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत आणि हल्लाबोल होत आहे.

Dhanshri Shintre

रोखठोक बोलणाऱ्या राज ठाकरेंनी आता कुंभमेळ्यातील स्नानाची खिल्ली उडवली आहे. त्यावरुन श्रद्धेच्या विश्वातून राज ठाकरेंवर हल्लाबोल होतो आहे. पाहूया राज ठाकरेंनी नेमकं या रिपोर्टमधून काय म्हटलंय.

प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर कोट्यवधी भाविकांनी पवित्र स्नान केलं. अगदी सामान्यांपासून ते नेते मंडळी, उद्योगपती, सेलिब्रेटी यांनी गंगेत डुबकी मारली. महाशिवरात्रीला कुंभमेळाची सांगता झाली. मात्र राज ठाकरेंनी गंगा स्नानावर केलेली टिप्पणी चर्चेत आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १९ वा वर्धापन दिन सोहळा पिंपरी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात पार पडला.

यावेळी बोलतांना राज ठाकरेंनी महाकुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची खिल्ली उडवली. तर 65 कोटी लोकांनी कुंभमेळ्यात स्नान केले त्या श्रध्देचा राज ठाकरे अपमान करित आहेत, अशी टीका महंत सुधीरदास महाराज यांनी केली आहे. राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलंय. हिंदुत्त्वाचा अजेंडा घेऊन पुढे येणाऱ्या सो कॉल्ड लोकांनी हिंदूच्या भावना दुखावतील असे बोलणे टाळले पाहिजे अशी टिका शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी केली आहे.

राज ठाकरेंच्या या वक्तव्यानं दुषीत नद्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येणार हे निश्चित आहे. पंतप्रधान मोदींपासून ते राज्यातल्या नेत्यांवर रोखठोक बोलणारे, मराठीच्या मुद्यावरुन नेहमीच आक्रमक भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी ठाकरे शैलीत कुंभमेळ्यातील वास्तवावर टिप्पण केलीये. आता हा वाद कुठल्या वळणावर जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT