Prakash Ambedkar And Narendra Modi  Saam Tv
महाराष्ट्र

Prakash Ambedkar: 'भाजप- आरएसएसकडून देवाचा EVM प्रमाणे वापर..' प्रकाश आंबेडकरांचा घणाघात!

Prakash Ambedkar On Ram Mandir Inauguration: भारतीय जनता पक्ष राममंदिर उद्घाटनाचा राजकीय इव्हेंट करत असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भेट भाजप आरएसएसवर निशाणा साधला आहे.

Gangappa Pujari

मयुर राणे, प्रतिनिधी|ता. १८ जानेवारी २०२४

Prakash Ambedkar News:

२२ जानेवारीला अयोध्या नगरीमध्ये श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. एकीकडे देशभरात राममंदिर उद्घाटन सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत असतानाच राजकीय मैदानात आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. भारतीय जनता पक्ष राममंदिर उद्घाटनाचा राजकीय इव्हेंट करत असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भेट भाजप आरएसएसवर निशाणा साधला आहे.

प्रकाश आंबेडकराचे भाजप- RSS वर टीकास्त्र..

"कसलेही तत्व आणि नैतिकता न बाळगता, भाजप- आरएसएस राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमाचा राजकीय फायद्यासाठी वापर करून देवालाच काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत.भाजप आरएसएस देवाला EVM प्रमाणे वापरत आहेत..' अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली आहे.

तसेच "मागच्या १० वर्षांत भाजप आरएसएसने (BJP-RSS) बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, रवींद्रनाथ टागोर, भगत सिंग यांसारख्या अनेक भारतीय महापुरुष व त्यांच्या वारशांना काबीज करण्याचा प्रयत्न केला, कारण त्यांचे स्वतःचे असे कोणतेही महापुरुष नाहीत," असा टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राममंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रणही नाकारले..

दरम्यान, याआधी प्रकाश आंबेडकर यांनी राममंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण मिळाले आहे, मात्र मी जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी भारतत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दाखला देताना भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या राजकीय फायद्यासाठी धार्मिक कार्यक्रमाचा वापर करत असल्याचा घणाघात केला होता. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT