uddhav thackeray  Saam tv
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का; ६ खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, दिल्लीत घडामोडींना वेग, तारीख ठरली

Shiv Sena split update : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ! ठाकरे गटाचे ६ खासदार शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा. 'ऑपरेशन टायगर'मुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता.

Namdeo Kumbhar

Uddhav Thackeray Shiv Sena split update : महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी दोन दिवसांत पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ६ खासदार शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. या खासदारांच्या गटाने आज लोकसभा अध्यक्षांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील तातडीने दिल्लीत दाखल झाले आहेत. शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतल्याने या चर्चांना उधाण आले आहे.

राजधानी दिल्लीत एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या या खासदारांची भेट घेतल्याचे समजते. यामध्ये स्वतंत्र गट स्थापन करून नंतर शिंदेच्या शिवसेनेत विलीन होण्याची रणनीती आखली जात असून, या संपूर्ण प्रक्रियेला 'ऑपरेशन टायगर' असे नाव देण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

'हे' ६ खासदार सोडणार ठाकरेंची साथ?

१. संजय देशमुख (यवतमाळ-वाशीम)

२. संजय जाधव (परभणी)

३. भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी)

४. संजय दिना पाटील (मुंबई ईशान्य)

५. नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली)

संजय राऊत, अनिल देसाई आणि अरविंद सावंत दिल्लीत एकत्रित पत्रकार परिषद घेणार असल्याचीही माहिती समोर येत असल्याने संभ्रम वाढला आहे. दुसरीकडे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबळाकर हे 'नॉट रिचेबल' असल्याचे समजते.

१९ जूनला गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये होणार अंतिम सोहळा?

'ऑपरेशन टायगर'ला मुंबईत अंतिम रूप देण्यात येणार आहे. लोकसभा अध्यक्षांकडे संसदेत स्वतंत्र गट स्थापन करण्याची अधिकृत मागणी केल्यानंतर, मुंबईत या खासदारांचा भव्य प्रवेश सोहळा पार पडणार आहे. शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा आगामी १९ जून रोजी वर्धापन दिन आहे. याच वर्धापन दिनाचे औचित्य साधून गोरेगाव येथील 'नेस्को सेंटर' (Nesco Center) मध्ये या ६ ही खासदारांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अधिकृत पक्षप्रवेश होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नांदेड-परभणीतून थेट दिल्ली वारी: खासदार आष्टीकर, जाधव आणि देशमुख 'अंडरग्राउंड'

या संपूर्ण बंडाची पाळेमुळे मराठवाडा आणि विदर्भाशी जोडली गेली आहेत. काल रात्री नांदेड विमानतळाहून परभणीचे खासदार संजय जाधव आणि यवतमाळचे खासदार संजय देशमुख खाजगी विमानाने दिल्लीला रवाना झाले. तेव्हापासूनच या 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा रंगली.

दुसरीकडे, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर काल दुपारपासूनच 'नॉट रिचेबल' होते. त्यांचा फोन बंद होता. नांदेड येथील डॉक्टर लेन भागातील 'कृष्णकुंज' इमारतीत असलेल्या त्यांच्या फ्लॅटवर कुटुंबातील एकही सदस्य उपलब्ध नाही. खासदार आष्टीकर काल रात्री हदगावहून आधी हैदराबाद आणि त्यानंतर हैदराबाद मार्गे दिल्लीला पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात प्रायव्हेट पार्ट्समध्ये फंगल इन्फेक्शन का होते? जाणून घ्या कारणे आणि उपाय

Suryakumar Yadav : माझ्या नावानं खोटं..., व्हायरल पोस्टवर सूर्यकुमार यादवची सणसणीत चपराक, सूर्यवंशीसाठी खास मेसेज

French President Macron: मोठी बातमी! राष्ट्राध्यक्ष असलेल्या हॉटेलजवळ स्फोट; जगभरात खळबळ

Maharashtra News Live Update: आमदारांच्या बंद पडलेल्या कुक्कुटपालन केंद्रात आदिवासी विद्यार्थ्यांचे वस्तीगृह

Monsoon Foot Care: पावसाळ्यात चप्पल लागून पायावर फोड येतात? हे ७ सोपे उपाय करतील इन्फेक्शन आणि दुर्गंधी दूर

SCROLL FOR NEXT