Nilesh Patil joins Ajit Pawar NCP in Jalgaon saam tv
महाराष्ट्र

जळगावात शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Politics : जळगावमध्ये शिंदे गटाला मोठा धक्का बसलाय. माजी जिल्हा संपर्कप्रमुख निलेश पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय.

Bharat Jadhav

  • निलेश पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश केला.

  • निलेश पाटील शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले.

  • या पक्षांतरामुळे जळगावमध्ये शिंदे गटाला धक्का बसल्याची चर्चा

महायुतीतील सत्तेत वाटेकरी असलेल्या राष्ट्रवादीकडे मंत्रालयातील सर्वात महत्त्वांच खातं म्हणजे अर्थ खातं जाणार आहे. हिवाळी अधिवेशनाआधी राष्ट्रवादी पक्षाला अर्थखातं मिळणार असल्याची चर्चा आहे. राज्यपातळीवर ही उलाढाल होत असतानाच अजित पवार गटानं जळगावमध्ये शिवसेनेला मोठा धक्का दिलाय. शिवसेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख राहिलेल्या निलेश पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटाला रामराम ठोकलाय. या प्रवेशामुळे शिंदे गटाचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनाही धक्का बसल्याचे बोलले जातेय.

निलेश पाटील यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात रविवारी प्रवेश केला. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, प्रतिभा शिंदे आणि संजय पवार, योगेश देसले आदी नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

निलेश पाटील यांनी शिवसेनेला का केला जय महाराष्ट्र?

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर नीलेश पाटील शिवसेनेच्या कार्यभारावर टीका केली. शिवसेनेत काम करत असताना आपल्याला विश्वासात घेतले जात नव्हते, तसेच पक्षाच्या संघटनात्मक कामात सातत्याने डावलले जात होतं,अशी नाराजी निलेश पाटील यांनी व्यक्त केली. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी गंभीर आक्षेप घेत पक्षात काम करण्याची संधी आणि जबाबदाऱ्या पार पाडताना योग्य वागणूक मिळाली नसल्याचाही आरोप केला होता. याच कारणामुळे नाराजीतूनच आपण शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्याचा मृतदेह, अस्मानी संकटातही बळजबरी वसुली?

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर

अमेरिकेचा विक्रम मोडला! नाशिकमध्ये 501 शंखांचा निनाद; थेट गिनीज बुकमध्ये नोंद|VIDEO

Sleep Health : रात्री झोपेत मुलगा वारंवार बेड ओला करतो? पालकांनो, रागवण्यापूर्वी नक्की जाणून घ्या 'ही' ५ मोठी कारणे

Monday Horoscope : या 7 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात होणार मोठा बदल; वाचा सोमवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT