Ncp Merger News: Inside Story Of Sharad Pawar And Ajit Pawar Factions Reunion saam tv
महाराष्ट्र

NCP Merger: राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट! दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची इनसाईड स्टोरी

NCP Merger Inside Story: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला आहे. प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांच्या शरद पवारांसोबतच्या भेटींनंतर राजकीय हालचाली वाढल्या आहेत. १० नोव्हेंबरच्या बैठकीत नेमकं काय ठरणार? विलीनीकरणामागील खरी कहाणी काय आहे हे जाणून घेऊ.

Bharat Jadhav

  • दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला आहे.

  • १० नोव्हेंबर रोजी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार

  • दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांकडून सकारात्मक विधाने

गेल्या दोन ते तीन दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची घेतलेली भेट, त्यानंतर शरद पवार यांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवार यांनी घेतलेली पवारांची घेतलेल्या भेटीनंतर विलीनीकरणाच्या चर्चांनी अधिकच जोर धरलाय. दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सकारात्मक विधान केली जात आहेत. दोन्ही राष्ट्रवादी का एकत्र येणार आहेत, याची इनसाईड स्टोरी सामच्या हाती आलीय. नेमकी ही एकत्रीकरणाची खरी कहाणी काय आहे, हे जाणून घेऊ.

१० नोव्हेंबरला राजकीय उलथापालथ

शरद पवार हे मुंबईतील हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असताना अजित पवार गटाचे प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यांच्या चर्चेनंतर पटेल यांनी विलीनीकरणावर केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना दोन्ही पक्षाची पुढील बैठक १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यात बैठकीत सविस्तर चर्चा केली जाईल अशी माहिती दिली होती.

राज्यसभा खासदार पार्थ पवार यांनी सलग दुसऱ्या दिवशी शरद पवारांची भेट घेतली. मुंबईतील 'सिल्वर ओक' या निवासस्थानी शरद पवार आणि पार्थ पवार यांची दोन तास चर्चा झालीय. शरद पवार रुग्णालयातून डिस्चार्ज झाले होते, त्यावेली सिल्वर ओक बंगल्यावर दोन्ही गटातील नेत्यांची बैठक झाली होती. त्या बैठकीत पार्थ पवार सुद्धा उपस्थित होते.

तटकरेंचं विलीनीकरणावरील विधान

प्रफुल्ल पटेल आणि शरद पवारांच्या भेटीनंतर सुनील तटकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत मोठा खुलासा केला होता. 'अजित पवार हयात असते, तर १२ फेब्रुवारी २०२६ रोजी दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण झाले असते. ही तारीख स्वतः अजितदादांनी मला सांगितली होती,' असा दावा तटकरेंनी केला होता. मात्र, सध्या विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा सुरू नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

विलीनीकरणाची इनसाईड स्टोरी काय?

दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण व्हावं अशी भाजपचीच इच्छा असल्याचं सांगितलं जातंय. ज्यावेळी अजित पवार गटाच्या प्रमुख नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती, त्यावेळी त्याआधी पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर दोन्ही गटातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या.

हे सर्व घडामोडी भाजपच्या आदेशानेच चालू आहेत किंवा विलीनीकरणाला भाजपचा हिरवा कंदील आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. बैठकांचं सत्र सुरू झाल्यानंतर सुनील तटकरेंच विधान सर्वासमोर आलं. ते असं एकदम समोर आलं नाही तर एका प्लॅनिग असून घडामोडी घडवल्या जात आहेत.

भेटीगाठींचा खेळ

२१ ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबत अमित शाहांची भेट घेतली.

त्यानंतर २५ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत अर्थ खात्याची मागणी करायची असा निर्णय झाला.

त्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी पार्थ पवारांकडून उमेश पाटील यांची प्रवक्तेपदी आणि झिशान सिद्धकी यांची मु्ंबई अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

१ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अमित शाहांची भेट घेतली. या बैठकीला सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार उपस्थित नव्हते. त्यानंतर लगेच सुनेत्रा पवार यांनी कोअर कमिटीची बैठक बोलावली. ३ नोव्हेंबर रोजी सुनेत्रा पवार यांनी आमदारांसोबत महत्त्वाची बैठक बोलवली.

४ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना फोन करत त्यांच्या तब्येतची विचारपूस केली होती.

शरद पवारांना पंतप्रधान मोदींचा फोन

शरद पवार रुग्णालयात अॅडमिट असताना पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांना फोन करून त्यांना तब्येतची काळजी घेण्यास सांगितलं होतं. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी आपण आणि सुप्रिया सुळे देश संभाळू तु्म्ही आम्हाला मार्गदर्शन करा असं पवारांना म्हटलं होतं. त्यावर शरद पवार यांनीही सकारात्मक उत्तर दिलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amazing Places in India : परदेशात जाण्याची गरजच नाही! भारतातील 'या' ७ जागा स्वर्गापेक्षा कमी नाहीत

Maharashtra News Live Update: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील दोन नगरसेवकांची मदत; मुख्यमंत्री सहायता निधीला ३.७१ लाखांचे योगदान

Gokul Milk Union: गोकुळचा अध्यक्ष कोण ठरवणार?गोकुळच्या सत्तासंघर्षात नवा कायदेशीर पेच, निवडणुकीकडे कोल्हापूरचं लक्ष!

Cancer Drug Prices: कॅन्सरच्या औषधांच्या किमतीत मोठी कपात! 1364 औषधांची नवी MRP आजपासून लागू; रुग्णांना होणार 3540 कोटींचा फायदा

मुंबईत रॉकेट फटाके उडवण्यावर बंदी! महापालिका आयुक्तांचा मोठा निर्णय; प्रशासनाकडून आदेश जारी

SCROLL FOR NEXT