jitendra Awhad News Saam TV
महाराष्ट्र

Jitendra Awhad: मोठी बातमी! 'मला कोणत्याही क्षणी अटक होईल...' जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याने खळबळ

जिंतेद्र आव्हाड यांनी मला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते असे धक्कादायक विधान केले आहे.

Gangappa Pujari

Mumbai: राज्याच्या राजकारणातून सध्या एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीचे नेते जिंतेद्र आव्हाड यांनी मला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते असे धक्कादायक विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Jitendra Awhad)

समोर आलेल्या माहितीनुसार, "केंद्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार आपल्याला जेलमध्ये टाकण्याचा प्लॅन आखण्यात" आल्याचा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. या अटकेचे कारण काय आहे. त्यांच्या अटकेचा प्रयत्न केंद्रातील कोणता मंत्री करत आहे याबद्दल मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

प्रसारमाध्यमांशी बोलताना “केंद्रातील ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, "कोणत्याही परिस्थितीत मला अटक करण्यात येईल. ठाणे महापालिका निवडणूक होईपर्यंत अथवा त्यानंतर काही महिने जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. माझ्याविरोधात एकही गुन्हा दाखल नाही. पण, ही बातमी मिळते तेव्हा आश्चर्य वाटतं,” असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा आझाद मैदानाऐवजी नेस्कोमध्ये होणार

स्पेसक्राफ्ट एका दिवसात किती फेऱ्या मारतं?

Crime News: बॉक्सर मेरी कोमच्या घरी चोरी, ३ अल्पवयीन मुलांना अटक; चोरीस गेलेल्या वस्तू जप्त

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून गेले शिंदेंचे आमदार, लाखोंची प्रॉपर्टी विकून केली मदत; पाहा VIDEO

नवी मुंबईत स्पा सेंटरच्या आड वेश्या व्यवसाय; ६ हजारासाठी तरूणींवर दबाव, पोलिसांकडून पर्दाफाश

SCROLL FOR NEXT