Sanjay Kaka Patil Jayant Patil Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'लवकरच जयंत पाटलांचा भाजप प्रवेश होईल...' खासदार संजय काका पाटील यांचा मोठा दावा

Sanjay Kaka Patil On Jayant Patil: भाजपच्या (BJP) होकायंत्राचा इशारा असून लवकरच त्यांचा प्रवेश होईल.. अशी दिशा धरुया, असे मोठे विधान संजय काका पाटील यांनी केले.

विजय पाटील

Sangali News: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अजित पवार गटात जाण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आल्यानंतर या चर्चा सुरू झाल्या होत्या. या चर्चा सुरू असतानाच जयंत पाटीलांचा लवकरच भाजपात प्रवेश करतील असा खळबळजनक दावा भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी केला आहे. (Maharashtra Politics)

याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपात येतील, असे संकेत सांगलीचे भाजपा खासदार संजय काका पाटील यांनी दिले आहेत. मिरजमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

"भाजपच्या (BJP) होकायंत्राचा इशारा असून लवकरच त्यांचा प्रवेश होईल, अशी दिशा धरुया... असे सुचक वक्तव्य खासदार संजयकाका पाटील (Sanjay Kaka Patil) यांनी सूचक वक्तव्य केले आहे. संजय काका पाटील यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

सध्या महापालिका क्षेत्रातील जयंत पाटील (Jayant Patil) गटाचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजितदादांच्या गटात दाखल झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जयंती पाटील कुठे जाणार ? अशा चर्चा सुरू आहेत.

यावरून संजयकाका पाटील यांनी "जयंत पाटील आता कुठे जाणार ? असा प्रश्न उपस्थित करत जयंत पाटील यांचा भाजपा प्रवेश होईल," असे संकेत दिले आहेत. या कार्यक्रमात भाजपचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्यासह भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sea Fort : चारही बाजूंनी अथांग समुद्र अन् मध्यभागी भव्य किल्ला, मुंबईजवळच आहे दगडी बेटावरचा ऐतिहासिक जलदुर्ग

Maharashtra News Live Update: लातूर जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळला, उभ्या पिकांवरून फिरवला नांगर

Shocking : रात्री दारू पार्टी करून झोपले, सकाळी उठलेच नाहीत, १९ जणांचा मृत्यू

Sunthach Paani: दररोज सकाळी न चुकता प्या सुंठाचं पाणी; मिळतील हे 6 चमत्कारिक फायदे

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धीवर अपघाताचा थरार! भरधाव कारची ट्रकला धडक, आयटी इंजिनिअरसह तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT