Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राष्ट्रवादीमध्ये लवकरच भाकरी फिरणार? पक्षात मोठे फेरबदल होणार; अमित शहांसोबत झाली बैठक

Maharashtra NCP cabinet Reshuffle: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अमित शाह यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली असल्याची माहिती समोर आली.

Priya More
  • शिंदेसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता

  • अमित शहा यांच्यासोबत दिल्लीत यासंदर्बात बैठक पार पडली

  • सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या मंत्र्यांबाबत लवकरच निर्णय घेणार

  • अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार असल्याची चर्चा

वैदेही काणेकर, मुंबई

महायुतीमध्ये वेगवान घडामोडी घडत आहेत. शिवसेना शिंदेगटापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदल होण्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली सध्या सुरू आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत पक्षातील वरिष्ठ नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. राष्ट्रवादीतील अकार्यक्षम मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नागपूर अधिवेशनापूर्वी याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२०२४ ला विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या भरगोस यशानंतर आता महायुती सरकारला जवळपास अडीच वर्षे पूर्ण होत आहेत. अशातच इतर निवडून आलेल्या प्रतिनिधींनाही संधी मिळण्यासाठी आता शिवसेनेच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील बदलाचे वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही जुन्या मंत्रांना डच्चू देऊन नवीन चेहऱ्याला संधी देण्यासंदर्भात हालचाली सध्या सुरू झाल्या आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये अकार्यक्षम मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्यासंदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचप्रमाणे महायुतीची प्रतिमा उंचावण्यासाठी आणि जनतेमध्ये विश्वास संपादन करण्यासाठी काही नवीन चेहऱ्यांनाही यापुढे संधी देण्यासंदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मंत्र्यांची प्रतिमा वेगवेगळ्या गोष्टीमुळे डागाळली असल्यामुळे जनतेच्या मनात या संदर्भात राग असल्याचेही समोर आलं होतं.

अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही वादग्रस्त आणि वाचाळवीर मंत्र्यांना डच्चू देऊन त्या व्यतिरिक्त काही नव्या आणि काही अनुभवी चेहऱ्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळ घेण्यासंदर्भात चर्चा झाली असल्याची देखील माहिती मिळत आहे. लवकरच याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची देखील बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार लवकरच याबाबत निर्णय घेतील. पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून देखील याबाबत सल्ला घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जिल्हा बँकेच्या बिनविरोधला हरताळ! विखे-थोरातांच्या सहकार पॅनलसमोर लंकेंचं परिवर्तन, सभापती राम शिंदेंची स्वतंत्र चूल

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला चंद्र कधी दिसणार? जाणून घ्या योग्य मुहूर्त

Sabja Pudina Water Benefits: उन्हात शरीराला थंडावा देण्यासाठी प्या सब्जा-पुदिन्याचं पाणी; मिळतील हे ७ फायदे

Vande Bharat : महाराष्ट्रातील पहिली स्लीपर वंदे भारत १ नोव्हेंबरपासून धावणार; जाणून घ्या, तिकीट किती आणि थांबे कोणते

15 Days Without Rice: 15 दिवस भात खाणं सोडलं तर शरीरात काय बदल होईल?

SCROLL FOR NEXT