ajit pawar x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार? अजित पवारांच्या नेत्यानं दिलं मोठं स्पष्टीकरण

Maharashtra Political News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावर लढणार का? यावर अजित पवारांच्या मोठ्या नेत्याने स्पष्टीकरण दिले आहे.

Yash Shirke
  • नागपूरच्या चिंतन शिबिरात धर्मरावबाबा आत्राम यांचे मोठे स्पष्टीकरण.

  • राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर की महायुतीसोबत लढणार यावर चर्चा.

  • कार्यकर्त्यांच्या आग्रहावर अंतिम निर्णय शेवटच्या क्षणी होणार.

Maharashtra : नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चिंतिन शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरादरम्यान धर्मरावबाबा आत्राम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यादरम्यान राष्ट्रवादी स्थानिक पातळीवर स्वबळावर लढणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना धर्मरावबाबा आत्राम यांनी महत्त्वाची माहिती दिली.

'आज जे शिबिर आहे ते चिंतन होण्याच्या दृष्टिकोनातून आयोजित करण्यात आले आहे. संपूर्ण राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेते येथे (नागपूर) येत निवडणुकीसाठी येत आहेत. स्थानिक पातळीवर निवडणूक लढवण्यासाठी नेते इच्छुक आहेत. त्यावर विचार मंथन होईल. ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या भरवशावर जिंकायची आहे. विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पुढे येत आहे. त्या दृष्टिकोनातून एकच म्हणणं आहे की, मतकी समान वाटप होत असेल तर महायुती म्हणून आपण लढायचे आहे', असे वक्तव्य धर्मरावबाबा आत्राम यांना केले.

'कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की, स्वबळावर लढले पाहिजे, त्यासाठी स्थानिक पातळीवर कुठल्या पद्धतीने नियोजन केले जाणार आहे?' असा प्रश्न विचारला गेला. 'स्वबळावर लढण्याबाबतची गोष्ट शेवटच्या क्षणी ठरवली जाऊ शकते. आजतरी आमचा विचार आहे की, महायुती म्हणूनच लढायचे', असे धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले.

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूरमध्ये भव्य चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात ५०० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे. चिंतनानंतर 'नागपूर जाहीरनामा' स्वीकारणार येणार आहे. अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक प्रमुख नेते या शिबिराला उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT