सागर निकवाडे, साम प्रतिनिधी
गेल्या तीन महिन्यांपासून पालकमंत्रीविना कारभार हाकणाऱ्या नंदुरबार जिल्ह्याला अखेर पालकमंत्री मिळाले आहेत. नंदुरबार जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री म्हणून राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुश्रीफ यांच्याकडे आधीच सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आहे. आता त्यांच्याकडे सोलापूरसोबतच नंदुरबारचाही पदभार देण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांच्याकडे आधी नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद होतं. परंतु शासकीय सदनिका लाटल्याप्रकरणात दोषी आढळल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर नंदुरबारचे पालकमंत्रिपदही त्यांच्याकडून काढून घेण्यात आले. डिसेंबर २०२५ पासून नंदुरबार जिल्ह्याला पालकमंत्री मिळाला नव्हता. आज अखेर जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले आहेत.
हसन मुश्रीफ यांच्याकडे सोलापूरसोबतच नंदुरबारचाही पदभार देण्यात आलाय. या नियुक्तीमुळे नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडे अजित पवार गटाकडे आली आहे. राज्य शासनाने अधिकृत परिपत्रक काढून या निवडीवर शिक्कामोर्तब केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.