Nana Patole News saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : मोठी बातमी! फडणवीसांबाबत दिल्लीत कट रचला जातोय, नाना पटोले यांचा धक्कादायक दावा

Nana Patole News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्याबाबत दिल्लीत कट रचला जात असल्याचा धक्कादायक दावा नाना पटोले यांनी केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Politics : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक धक्कादायक विधान केलं आहे. दिल्लीत देवेंद्र फडणवीस याच्याबाबत कट रचला जात असल्याचा दावा पटोले यांनी केला आहे. साम टीव्हीला दिलेल्या एक्स्क्लुजीव्ह मुलाखतीत पटोले यांनी हे धक्कादायक विधान केले आहे.

नाना पटोले म्हणाले, दिल्लीच्या सरकारमध्ये काय चालू आहे हे मीडियालाही माहिती आहे, पण मीडिया ते दाखवत नाही. महाराष्ट्रात देवेंद्र पडणवीसांविरोधात काय चालू आहे हे तुम्ही दाखवता का? असं नाना पटोले म्हणाले. (Latest Marathi News)

त्यानंतर फडणवीसांविरोधात नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना माझ्या मित्रालाच विचारा किती चाललंय त्याच्या विरोधात असे नाना पटोले म्हणाले. तो मला सांगतो मला तुम्हाला सांगता येणार नाही, तोच सांगेल असे नाना पटोले म्हणाले. (Latest Political News)

नाना पटोलेंच्या या विधानानंतर आता उलट सुलट राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. देवेंद्र फडणवीसांविरोधात राज्याच्या राजकारणातच कट रचाला जात आहे का असा प्रश्न आता नाना पटोले यांच्या धक्कादायक दाव्यानंतर उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandup : भांडुपमध्ये मोठी दुर्घटना, पहिल्या मजल्यावरून ९ जण खाली पडले; एकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: कोथरुडमधील 'निर्वाण बिहार' सोसायटीत गुंडाचा हैदोस

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कुणाला देणार संधी, 'या' ६ नेत्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT