Sharad Pawar Ajit pawar Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: अजित पवारांना पहिला धक्का! काल पाठिंबा दिलेला खासदार शरद पवारांसोबत; ट्वीट व्हायरल...

कालपर्यंत राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवारांनी बंड करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने खळबळ उडाली आहे...

Rashmi Puranik

Amol Kolhe News: कालचा दिवस राज्याच्या राजकारणासाठी (Maharashtra Politics) अनेक हादरे देवून गेला. ज्याच्या केंद्रस्थानी होते राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे नेते अजित पवार. कालपर्यंत राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवारांनी बंड करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

अजित पवार यांनी ४० आमदारांसोबत शिंदे- फडणवीस सरकारला पाठिंबा दिला असून त्यांच्यासोबत ९ आमदारांनीही शपथ घेतली. या संपूर्ण नाट्यमय घडामोडीनंतर अजित पवार यांना पहिला धक्का मिळाला असून काल शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेले अमोल कोल्हे यांनी मी साहेबांसोबत.. असे ट्विट केल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, काल अजित पवार (AJit Pawar) यांच्यासोबत राष्ट्रवादीतला एक मोठा गट बाहेर पडला. अजित पवार यांच्यांसोबत जाणाऱ्या आमदारांची संख्या ४० पेक्षा जास्त असल्याचा दावा केला जात आहे. दुसरीकडे शरद पवार (Sharad Pawar) पुन्हा मैदानात उतरले आहे. त्यांनी स्वत: सर्वच आमदारांना फोन करुन त्यांच्यांशी चर्चा केली आहे.

या दरम्यान, काल अजित पवार यांच्यासोबत असलेले शिरुरचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी ट्वीट करत मी साहेबांसोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीच्या गोटात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

काय आहे कोल्हेंचे ट्वीट..

अमोल कोल्हे यांनी यासंबधी एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यामध्ये एक व्हिडिओ जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं.. असा सुचक ओळी लिहल्या आहेत.

तसेच ते उद्या शरद पवार यांची भेट घेणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. उद्या शरद पवार यांची भेट घेवून आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या आमदारांना 5 जुलैपर्यंतचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. त्याच दिवशी दोन्ही बैठकांचं नियोजन करण्यात आलं आहे. तर अल्टीमेटम दिल्यामुळे नेते आपली भूमिका स्पष्ट करत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Pune Crime : कोंढवा तरुणी अत्याचार प्रकरणात पुन्हा ३६० डिग्री टर्न, आरोप असलेल्या तरुणाला अटकच नाही

SCROLL FOR NEXT