Raj Thackeray Mukesh Ambani Saamtv
महाराष्ट्र

MNS News: 'बोऱ्याबिस्तरा गुंडाळा आणि गुजरातला जा...' मनसेचा मुकेश अंबानींवर निशाणा

MNS On Mukesh Ambani Statement: "रिलायन्स ही गुजराती कंपनी होती आणि भविष्यातही गुजराती कंपनी राहील," असे मुकेश अंबानी म्हणालेत. अंबानींच्या या विधानावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संताप व्यक्त करत जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.

Gangappa Pujari

गिरीश कांबळे, मुंबई|ता. ११ जानेवारी २०२४

Sandeep Deshpande News:

आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि भारतातील आघाडीचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचं एक वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. मुकेश अंबानी यांनी गुजरातला आपली मातृभूमी आणि कर्मभूमी असल्याचे सांगितले आहे. तसेच रिलायन्स ही गुजराती कंपनी होती आणि भविष्यातही गुजराती कंपनी राहील, असेही मुकेश अंबानी (Mukesh Ambani) म्हणालेत. अंबानींच्या या विधानावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संताप व्यक्त करत जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत अंबानींच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

काय म्हणालेत संदिप देशपांडे?

"रिलायन्स ही एक भारतीय कंपनी आहे असं आम्हाला वाटतं होतं. पण अंबानी यांनी कालच स्पष्ट सांगून टाकलं की रिलायन्स एक गुजराती कंपनी आहे. तुम्ही महाराष्ट्रात आलाच कशाला? जमिनी पण महाराष्ट्रातल्या वापरल्या. मराठी माणसाने जमिनी दिल्या, त्याचाच उपयोग करत उद्योग करता आहात ना?" असा सवाल संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी उपस्थित केला आहे.

बोऱ्याबिस्तरा गुंडाळा, गुजरातला जा..

तसेच "फक्त गुजरातीचं असाल तर महाराष्ट्रात तुमचं काम काय? जर तुमची कंपनीच गुजराती असेल तर बोऱ्याबिस्तरा गुंडाळा, तुमचा एंटिलियाचा गाशा गुंडाळा आणि गुजरातला जा.." असा इशाराही संदीप देशपांडे यांच्याकडून देण्यात आला आहे. यापुढे मराठी माणसाने हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपण एका गुजरात कंपनीकडून वस्तू घेत आहोत," असेही ते म्हणालेत.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंतप्रधानांवरही निशाणा...

"पंतप्रधान (Narendra Modi) त्यांच्या बाजूला उपस्थित होते तेव्हा त्यांनी हे विधान केलं. पंतप्रधान यांनी त्यांना सांगायला पाहिजे होतं तुमची कंपनी भारतीय आहे, की पंतप्रधान पण फक्त गुजरातचेच आहेत. प्रश्न असा आहे ह्याच गोष्टी आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा अख्खा देश आम्हाला संकुचित बोलतो. आता ते संकुचित नाही का?" असेही संदीप देशपांडे म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात एका संशयताला SIT ने घेतले ताब्यात

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

कितीही खासदार फोडा, उरावर भगवा फडकवणार, ओमराजेंच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडली

Spring Roll Recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी स्प्रिंग रोल; वाचा सोपी रेसिपी

केतनच्या हत्येमागचं डिजिटल कनेक्शन उघड, गुगलवर शोधले पर्याय, लोहगडावर सराव

SCROLL FOR NEXT