Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : महाविकास आघाडीत मनसेची एंट्री? मोठ्या घडामोडीची शक्यता, बड्या नेत्याचे सूचक वक्तव्य

Maharashtra Political News : मनसे-ठाकरे गट युतीच्या धर्तीवर महाविकास आघाडीमध्ये मनसे समाविष्ट होणार असल्याची चर्चा रंगली आहे. यावर महाविकास आघाडीच्या नेत्याने सूचक वक्तव्य केले आहे.

Yash Shirke

  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना मविआमध्ये समाविष्ट होणार?

  • उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्या युतीवर बड्या नेत्याचं वक्तव्य

  • राज्यात राजकीय घडामोडींना सुरूवात

Maharashtra : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहे. मराठीच्या मुद्यावरुन दोन्ही ठाकरे बंधू बऱ्याच वर्षांनी एकत्र आले. पण अजूनही शिवसेना आणि मनसे युतीबाबत घोषणा झालेली नाही. आगामी काळात ते एकत्र येतील असे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत हालचाली सुरु झाल्या आहे. यासंदर्भात महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट निर्णय घेणार असल्याचे म्हटले जात आहे.

माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचा आगामी निवडणूका आणि मनसे-ठाकरे गट यांच्या युतीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. अनिल देशमुख यांच्या वक्तव्यामुळे राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्षा महाविकास आघाडीत सामील होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

'संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांकडे लागले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठीचा जो मुद्दा घेतला आहे, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर ठाकरे बंधूंची सत्ता येऊ शकते. आमची आणि काँग्रेसची काय भूमिका असेल याविषयी पुढील काळामध्ये चर्चा होईल', असे अनिल देशमुख म्हणाले.

'दोघेही भावांचे आता मनोमिलन झाले आहे ही आनंदाची गोष्ट आहे मराठी माणसांसाठी सुद्धा आनंदाची गोष्ट आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्याचा परिणाम मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात होईल', असे वक्तव्य माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. 'महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरेंना समाविष्ट करायचे का? याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. यावर काँग्रेस पक्षाचा काय विचार आहे हे पाहिले जाईल. महाविकास आघाडीतील सर्व नेते एकत्र बसून यावर निर्णय घेतील', असे सूचक वक्तव्य माजी गृहमंत्र्यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Farmer Loan Waiver Scheme: मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार, सरकारचा मोठा निर्णय

पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

SCROLL FOR NEXT