Maharashtra Politics Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics: छगन भुजबळ भाजपची स्क्रिप्ट वाचतात अन् नामदेव जाधव ती कॉपी करतात, काय म्हणाले रोहित पवार? जाणून घ्या

Maharashtra Politics: युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून बीड जिल्हा दौऱ्यावर असणाऱ्या आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ आणि नामदेव जाधव यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Politics

युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून बीड जिल्हा दौऱ्यावर असणाऱ्या आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ आणि नामदेव जाधव यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. छगन भुजबळ हे भाजपची स्क्रिप्ट वाचतात आणि त्यांना नामदेव जाधव हे कॉपी करतात आणि या दोघांना पुढे करणारे देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

नामदेव जाधव स्वतःला माता जिजाऊंचे वंशज समजतात. त्याच कारण असं सांगतात, की मी माझ्या पुस्तकात असं लिहिलंय, की मी वंशज आहे. आता जी व्यक्ती माता जिजाऊंचं नाव चुकीच्या पद्धतीने घेते आणि वंशज आहे असं सांगत आहे, अशांचा मी निषेध करतो. त्यांचं नाव घेऊन ते पुस्तक विकतात, व्यवसाय करतात, त्यांना आमदार व्हायचं आहे. अशा खालच्या विचाराची माणसं काहीही बोलतील आणि त्यावर आम्ही प्रतिक्रिया देणं योग्य नसल्यांच ते म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ज्यांनी शाई टाकली त्या कृत्याचं आम्ही समर्थन करत नाहीत. शरद पवारांच नाव बदनाम करण्याचा प्रयत्न जाधवांकडून केला जात असताना काही कार्यकर्ते गप्प बसत नाहीत. मात्र त्या कार्यकर्त्यांना काही अडचण आली तर आम्ही त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहू. असं म्हणत रोहित पवार यांनी नामदेव जाधव यांना काळं फासणाऱ्या कार्यकर्त्यांची बाजू मांडली.

नामदेवराव जाधव हे भुजबळांची भाषा बोलतात. त्यांची कॉपी करतात आणि भुजबळ साहेब जे काही बोलतात ते भाजपची स्क्रिप्ट वाचतात आणि या दोन्ही नेत्यांना कोणी पुढे केले असेल ? याचा अभ्यास केला तर नाव पुढे येते, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं, असा आरोप त्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घरबसल्या ५ मिनिटांत ट्रान्सफर करा जुन्या कंपनीचा PF; चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळवण्यासाठी फॉलो करा 'ही' एक ट्रिक

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 8व्या वेतन आयोगाबाबत लवकरच मोठा निर्णय होणार, किती असेल फिटमेंट फॅक्टर? वाचा...

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Health checkups after 40: वयाच्या 40 नंतर शरीरात सुरू होतात हे बदल, डॉक्टरांनी सांगितल्या या 4 टेस्ट करून घ्याच!

Gold Rate Today : गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं ४००० रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे 18K- 22K आणि 24K चे दर

SCROLL FOR NEXT