SHARAD PAWAR  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: भाजपचं सरकार आणण्यात शरद पवारांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा, केंद्रीय मंत्र्यांचा खळबळजनक दावा

Sharad Pawar: केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत खळबळजनक दावा केला. भाजपचं सरकार आणण्यात शरद पवारांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा, असा दावा त्यांनी केला आहे.

Priya More

संजय जाधव, बुलडाणा

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शरद पवारांबाबत मोठं विधान केले आहे. त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज्यात भाजपचं सरकार आणण्यात शरद पवारांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा, असा खळबळजनक दावा प्रतापराव जाधव यांनी केला आहे. 'आता या देशात मी कसा मोठा विरोधक आहे हे दाखविण्याचा शरद पवारांचा प्रयत्न सुरू.', असा टोला देखील त्यांनी लगावला. बुलडाण्यात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शरद पवार यांच्याबाबत हे वक्तव्य केले.

'२०१४ साली राज्यात भाजपचे सरकार आणण्यासाठी शरद पवारसाहेबांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा आहे. वेळोवेळी त्यांनी भाजपला मदत केली आहे. मात्र आता त्यांना एवढा भाजपचा तिटकारा का...?' असा सवाल मंत्री प्रतापराव जाधव यांनी केला आहे. तर, 'देशात सर्वात मोठा विरोधक मी व माझा पक्ष हे दाखवण्यासाठी आणि आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.', असा टोला देखील केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शरद पवारांना लगावला आहे.

त्यांनी यावेळी काँग्रेसवर देखील जोरदार टीका केली. 'राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना जर दारूचे भाव कमी पाहिजे असतील तर मी सरकारला त्यांच निवेदन देईल. हिंदू धर्मात कोणी कुठे कशी पूजा करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे रायगडमध्ये काही पूजा झाली असेल तर त्यात गैर काय?', असे देखील मत प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT