Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : महायुतीत पुन्हा टेन्शन; कर्जतच्या जागेवरून राष्ट्रवादी-शिवसेना आमनेसामने!

Mahendra Thorve Criticized NCP Ajit Pawar Group Sunil Tatkare : कर्जत विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत जुंपल्याचं दिसतंय. दोन्ही पक्षांकडून या जागेवर दावा केला जातोय.

Rohini Gudaghe

सचिन कदम, साम टीव्ही रायगड

रायगडमधून मोठी बातमी समोर येतेय. कर्जत विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेंच सुरू असल्याचं दिसतंय. शिंदे गट आणि अजित पवार गट या दोन्ही पक्षांकडून या मतदारसंघावर दावा केला जातोय. कर्जतच्या जगेवरून राष्ट्रवादी शिवसेना आमने सामने आल्याचं दिसतंय. अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रत्युत्तर दिल्याचंसमोर आलंय.

सुनिल तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते २८८ ही जागा (Maharashtra Politics) मागतील, असा टोला आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांना लगावला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघावर दावा केला होता. त्यावरून आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाद निर्माण झालाय.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाद

सुनिल तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे ते 288 ही जागा मागतील, अशी टीका आमदार महेंद्र थोरवे यांनी (Mahayuti Seat Sharing Crisis) केलीय. महायुतीचा निर्णय महायुतीतील नेते घेतील, तटकरे साहेब २८८ सिटवर लढतील, हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. महायुतीचा निर्णय महायुतीचे नेते घेतील, अशी प्रतिक्रया शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दिलीय. परंतु कर्जतच्या जागेवरून महायुतीतील शिंदे गट आणि अजित पवार गटात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय.

जागावाटपावरून महायुतीत मिठाचा खडा ?

कर्जत मतदारसंघावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी (NCP Ajit Pawar) दावा केल्यामुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये वातावरण तापल्याचं दिसत आहे. अजून महायुतीने आगा्मी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची यादी जाहीर केलेली नाही. सध्या कर्जतचे विद्यमान आमदार शिंदे गटाचे महेंद्र थोरवे (Shinde Group) आहेत, त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी ही जागा नेमक्या कोणत्या पक्षाला सोडतात? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. जागावाटपावरून महायुतीत मिठाचा खडा पडणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT