Ajit Pawar And Rohit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar: 'थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...', अजित पवारांचा रोहित पवारांना मिश्किल टोला

Ajit Pawar And Rohit Pawar: कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ म्हणजेच प्रीतीसंगमावर रोहित पवार यांची भेट अजित पवार यांच्यासोबत झाली. यावेळी अजित पवार यांनी रोहित पवार यांना मिश्किल टोला लगावला.

Priya More

विधानसभा निवडणुकीदरम्यान कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पवार यांनी भाजपचे उमेदवार राम शिंदे याचा पराभव केला. या मतदारसंघामध्ये आधी रोहित पवार यांचा पराभव झाल्याचे घोषीत करण्यात आले होते पण नंतर फेरमतमोजणी दरम्यान त्यांना विजयी घोषीत करण्यात आले. रोहित पवार यांनी १२०० मतांनी राम शिंदे यांचा पराभव केला.

विजयानंतर रोहित पवार आज साताऱ्यामध्ये आले होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी ते साताऱ्यामध्ये आले होते. यावेळी रोहित पवार यांची भेट अजित पवार यांच्यासोबत झाली. यावेळी अजित पवार यांनी रोहित पवार यांना मिश्किल टोला लगावला. या दोघांच्या भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ म्हणजेच प्रीतीसंगमावर अजित पवार आणि रोहित पवारांची भेट झाली. यावेळी अजित पवार यांनी रोहित पवार यांना म्हणाले की, रोहित थोडक्यात वाचला. माझी सभा झाली असती तर काय झालं असतं. दर्शन घे काकांचे.' असा मिश्किल टोला अजित पवार यांनी रोहित पवारांना लगावला. तर रोहित पवारांनी देखील खाली वाकत अजित पवारांच्या पाया पडले.

अजित पवार यांच्या भेटीनंतर रोहित पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'माझे ते काका आहेत म्हणून मी पाया पडलो. विचारांमध्ये भिन्नता आहे पण शेवटी जी काही संस्कृती आहे. एक वडिलधारी व्यक्ती आणि माझ्या २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी मला मदत केली होती. त्यामुळे काका असल्यामुळे आणि शेवटी संस्कृती असल्यामुळं पाया पडणं ही जबाबदारी आहे. ही जी भूमी आहे, तिथं भेदभाव करून चालत नाही, इथं संस्कृती पाळणं महत्त्वाचं आहे आणि आम्ही ती पाळतो.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून मराठा आरक्षणासाठी आंदोलन

Thumb sucking in children: लहान बाळांची अंगठा चोखण्याची सवय कशी मोडाल?

उरलेल्या चपाती फेकू नका! बनवा चटपटीत पदार्थ, न खाणारेही चाटून पुसून खातील

iPhone खरेदी करणाऱ्यांना मोठा धक्का! नवीन मॉडेल्सच्या लाँचनंतर iPhone 17, iPhone 16 आणि iPhone Air महागले

SCROLL FOR NEXT