Sadabhau Khot Criticized Jayant Patil Saam Tv
महाराष्ट्र

Sangli Politics: मुख्यमंत्रीपदासाठी जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा, सदाभाऊ खोतांनी उडवली खिल्ली, म्हणाले...

Sadabhau Khot Criticized Jayant Patil: नुकताच शरद पवार यांनी जयंत पाटील यांना मुख्यमंत्री बनवण्याबाबतचे संकेत दिले. त्यावरून भाजपचे नेते सदाभाऊ खोत यांनी वक्तव्य केले आहे. त्यावरून आता सदाभाऊ खोत यांनी टीका केली.

Priya More

विजय पाटील, सांगली

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे. उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून शेवटच्या काळात प्रचाराचा धडाका सुरू आहे. महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून अनेक चर्चा सुरू आहेत. नुकताच शरद पवार यांनी जयंत पाटील यांना मुख्यमंत्री बनवण्याबाबतचे संकेत दिले. त्यावरून भाजपचे नेते सदाभाऊ खोत यांनी वक्तव्य केले आहे. जयंत पाटील यांना मुख्यमंत्री करण्याबाबतच्या चर्चेवरून सदाभाऊ खोत यांनी खिल्ली उडवली.

'इस्लामपुरच्या जयंत पाटील यांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून काहीजण भावनिक राजकारण करत आता संधी आल्याचे सांगत आहेत. पण तिथे मुख्यमंत्री व्हायला १४५ गडी लागतात. तिथे काय छप्पराला मेडक द्यायचे का?', असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांना मुख्यमंत्री करण्याबाबतच्या चर्चेची खिल्ली उडवली.

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले पाटील यांच्या प्रचारार्थ इस्लामपूरमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचार सभेत आमदार सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांना मुख्यमंत्री करण्याबाबतच्या चर्चेची खिल्ली उडवली तसंच त्यांच्यावर टीका देखील केली. सदाभाऊ खोत यांच्या चर्चेवर आता जयंत पाटील नेमकं काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचे ठरेल.

'आमच्या लाडक्या बहिणीमुळे महायुतीला १८० पेक्षा जास्त जागा मिळतील आणि पुन्हा महायुतीचे सरकार येईल.' असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला. यावेळी सदाभाऊ खोत यांनी निशिकांत भोसले पाटील यांना आमदार बनवण्यासाठी आम्ही सगळे एक झालो, असे त्यांनी सांगितले. तसंच, निशिकांत पाटील आमदार होणार आहेत आणि ते आमदार झाल्यावर मी नामदार होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT