Babaji Kale On Dilip Mohite Patil Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: माझ्या उधारीसाठी तुम्हीच दिवाणजी व्हा, बाबाजी काळेंनी दिलीप पाटील यांना पराभवानंतर दिली नोकरीची ऑफर

Babaji Kale Criticized Dilip Mohite Patil: खेड आळंदी विधानसभा मतदारसघांचे नवनिर्वाचित आमदार बाबाजी काळेंनी पराभूत उमेदवार दिलीप मोहिते-पाटील यांच्यावर निशाना साधला.

Priya More

रोहिदास गाडगे, पुणे

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार बाबाजी काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते दिलीप मोहिते पाटील यांचा पराभव केला. जवळपास १ लाख ५० हजार १५२ मतांनी बाबाजी काळे विजयी झाले. विजयानंतर बाबाजी काळे यांनी दिलीप मोहिते पाटील यांच्यावर टीका करत त्यांना नोकरीची ऑफर दिली आहे. 'माझ्या उधारीसाठी तुम्हीच दिवाणजी व्हा...', असे वक्तव्य बाबाजी काळे यांनी केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खेड आळंदी विधानसभा मतदारसघांचे नवनिर्वाचित आमदार बाबाजी काळेंनी पराभूत उमेदवार दिलीप मोहिते-पाटील यांच्यावर निशाना साधला. 'निवडणूक काळात माझी उधारी, व्यवसायाची ठेकेदारी काढली कसला वारकरी म्हणून हिनवलंही पण आता दिलीप मोहिते- पाटील यांनी माझ्या उधारीची यादी आणावी. तुम्हीच दिवानजी व्हा सर्वांची उधारी देऊ.' अशा शब्दात बाबाजी काळेंनी मोहिते-पाटील यांच्यावर दिवाणजीच्या नोकरीची ऑफर दिलीय.

खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातल्या निवडणुकीदरम्यान बाबाजी काळे आणि दिलीप मोहिते पाटील याांनी जोरदार प्रचार केला. या प्रचारादरम्यान दोन्ही बाजुंनी आरोपांच्या फेरी रंगल्या होत्या. आता 'सामान्य लोकांनी गुंडगिरी दहशतीला बाजुला करुन वारकऱ्याला विधानसभेचा मानकरी केलाय.', असं म्हणत बाबाजी काळेंनी मतदारांचे आभार मानले.

दरम्यान, खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून दिलीप मोहिते पाटील, शिवसेना ठाकरे गटाकून बाबाजी काळे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्याचसोबत, वंचित बहुजन आघाडीकडून रविंद्र रनधावे आणि आणखी एका अपक्ष उमेदवाराने निवडणूक लढवली होती. या मतदारसंघामध्ये १३ उमेदवारांमध्ये निवडणुकीचा सामना रंगला होता. पण बालाजी काळे यांनी दणदणीत विजय मिळवला. सध्या त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

SCROLL FOR NEXT