nandgaon constituency politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: कांदेंना 'कारंजा' तर धात्रक यांना 'चिमणी', डमी उमेदवारांमुळे नाशिकचे राजकारण तापलं

Nandgaon Constituency Politics: यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील अनेक मतदारसंघामध्ये एकाच नावाचे अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे उमेदवारांसह मतदारांचा देखील गोंधळ उडणार आहे.

Priya More

अजय सोनवणे, मनमाड

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अवधी संपल्यानंतर आता राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडला. प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. यंदा राज्यातील ही निवडणूक खूपच रंगतदार होणार आहे. कारण राज्यातील अनेक मतदारसंघामध्ये एकाच नावाचे अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे उमेदवारांसह मतदारांचा देखील गोंधळ उडणार आहे. नाशिकच्या नांदगाव मतदारसंघात देखील हीच परिस्थिती आहे.

नाशिकच्या नांदगाव मतदारसंघात यंदा पहिल्यांदाच डमी उमेदवार रिंगणात उतरल्याने नांदगाव मतदारसंघ चर्चेत आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी या दोन्ही डमी उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. या दिवशी या दोन्ही उमेदवारांचे अर्ज मागे घेतले जातात का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण नाशिकच्या नांदगाव मतदारसंघातून सुहास बाबुराव कांदे आणि गणेश काशिनाथ धात्रक या डमी उमेदवारांची उमेदवारी कायम राहिली आहे.

सुहास कांदे यांना 'कारंजा' तर गणेश धात्रक यांना 'चिमणी' हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. लोकसभा निडवणुकीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघात बाबू भागरे पॅटर्न गाजला होता. त्याच धर्तीवर नांदगावमध्येही मतदारांची दिशाभूल करण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला असून महायुतीचे उमेदवार सुहास कांदे तसेच विकास आघाडीचे उमेदवार गणेश धात्रक यांचे नाम साधर्म्य असलेले उमेदवार शोधून त्यांना नांदगावमध्ये उमेदवारी करण्यास भाग पाडण्यात आले.

विशेष म्हणजे दोघेही डमी उमेदवार नांदगाव मतदारसंघातील रहिवाशी नाहीत. धात्रक दिंडोरीच्या ढकांबेचे तर कांदे धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या डमी पॅटर्नला मतदार भुलतील का? हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. या डमी उमेदवारांमुळे नांदगाव मतदारसंघातील राजकारण चांगलेच तापले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'भारताला तर पाकिस्तानही हरवेल...' टीम इंडियावर Wasim Akram ची जहरी टीका

Chandra Gochar 2024: 'या' ३ राशींचा गोल्डन टाईम संपला; चंद्राच्या गोचरमुळे अडचणीत होणार वाढ

Homemade Snacks Quick Recipe: पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा आलाय? मग नाश्त्याला 'या' युनिक रेसिपी नक्की ट्राय करा

UP Madrasa Act : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; UP मदरसा अ‍ॅक्टला मान्यता, 17 लाख विद्यार्थ्यांना दिलासा

HBD Virat Kohli: महागड्या गाड्या, अलिशान घर; दिवसाला कमावतो 5 कोटी! विराटची एकूण संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT